'या' व्हिडीओमुळे सारा- आर्यनची जोडी पुन्हा चर्चेत

कार्तिक आणि सारा सोशल मीडियावर किंवा कुठल्याही कार्यक्रमात एकत्र दिसले की त्यांच्याबद्दल जोरदार चर्चा होत असल्याच दिसते आहे.

Updated: Mar 26, 2019, 09:19 PM IST
'या' व्हिडीओमुळे सारा- आर्यनची जोडी पुन्हा चर्चेत  title=

मुंबई : दिग्दर्शक करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये अभिनेत्री सारा खानने तिच्या मनात असलेली गोष्ट सर्वांशी शेअर केली होती. तिला कार्तिक बरोबर डेटवर जायचं आहे, अशी इच्छा तिनं व्यक्त केली होती. त्यानंतर इम्तियाज अलीच्या 'लव आजकल'' या आगामी चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कार्तिक आणि साराला एकत्र काम करण्याची संधी मिळली. त्यामुळे सारा खूप खूश आहे. तेव्हापासून कार्तिक आणि सारा सोशल मीडियावर किंवा कुठल्याही कार्यक्रमात एकत्र दिसले की त्यांच्याबद्दल जोरदार चर्चा होत असल्याच दिसते आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

And that’s a schedule wrap for me in Delhi

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

'लव आजकल २' चित्रपटाचया पहिल्या शेड्युलची शूटिंग त्यांनी दिल्लीत केली. त्या दरम्यान कार्तिक आणि साराने खूप धमाल मस्ती केली. साराने तिचे आणि कार्तिकचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल आहेत. तिच्या फोटोनां प्रक्षेकांची खूप पसंतीही मिळाली आहे.  बॉलिवूडमधील पदार्पणाच्या केदारनाथ चित्रपटासाठी साराला फिल्मफेअर बेस्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तेव्हाही साराने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावर कार्तिकने कमेंट केली आणि सर्वांच्या नजरा पुन्हा जोडीवर आल्या. 'सारा आता कॉफीने काम चालणार नाही, दिल्लीत पार्टी पाहिजे' अशी कमेंट कार्तिकने त्या फोटोवर केली. आणि मग काय ? त्यांच्या फॅन्सना आनंदच झाला. सर्वांनी मिळून या दोघांना शुभेच्छा दिल्या.

sara kartik zee साठी इमेज परिणाम

 तिने तिचे आणि कार्तिक सोबतचे दिल्लीमधील व्हिडिओ इन्स्टाग्रावर टाकले आणि त्यावरही अनेक प्रेक्षकांनी लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पाडला. ते दोघे एवढ्यावरंच थांबले नाहीत. त्यानंतर सारा आणि कार्तिक एकत्र बाईक चालवतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला. सध्या हा व्हिडिओ जोरदार चर्चत आहे. 

zee sara kartik साठी इमेज परिणाम

२००९ मध्ये सैफ आणि दीपिका यांचा 'लव आजकल' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि चित्रपट हीट झाला होता. आता सारा आणि कार्तिकची जोडी पद्यावर काय धमाल करणार ? हे चित्रपट आल्यावर कळेलच. चित्रपटामध्ये त्या दोघांची केमिस्ट्री कशी आहे, हे प्रेक्षकांना लवकरचं पाहायला मिळणार आहे.