Sara Ali Khan : '2020 हे वर्ष होतं खूपचं वाईट', सारा अली खानचा मोठा खुलासा

Sara Ali Khan नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. सारा कोणासोबत रिलेशनशिपमध्ये नव्हती अशा चर्चा सुरु असताना ब्रेकअप विषयी सारा अली खाननं मोठा खुलासा केला आहे. यासोबतच सारानं तिच्यासाठी 2020 हे वर्ष कसं गेलं ते देखील सांगितलं आहे. 

Updated: Mar 5, 2023, 05:54 PM IST
Sara Ali Khan : '2020 हे वर्ष होतं खूपचं वाईट', सारा अली खानचा मोठा खुलासा title=

Sara Ali Khan On Break up to Flop Film in 2020 : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. सारा अली खान ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सारा अली खान ही चाहत्यांच्या संपर्कात राहते. सारानं बॉलिवूडमध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सारानं 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयानं सगळ्यांना सगळ्यांना फक्त आश्चर्य झालं नव्हतं तर त्या चित्रपटानंतर साराच्या चाहत्यांना लाखो संख्येनं वाढ झाली होती. या चित्रपटात तिनं दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतसोबत काम केले होते. दरम्यान, आता सारानं तिच्यासाठी 2020  हे वर्ष खूप खराब होतं असा खुलासा केला आहे. त्यावर्षी तिचं करिअर आणि तिच्या खासगी आयुष्यातही अनेक बदल झाले होते. साराचा 2020 च्या सुरुवातीला ब्रेकअप झाल्याचे तिनं सांगितले. 

सारा अली खाननं अलीकडेच रणवीर अल्लाबदियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सारानं 2020 बद्दल खुलेपणाने सांगितले. यावेळी सारा म्हणाली की 2020 हे वर्ष तिच्यासाठी सर्वात वाईट वर्षांपैकी एक आहे. त्या वर्षाची सुरुवातच माझ्या ब्रेकअपनं झाली होती. त्यानंतर माझा चित्रपटही चालला नव्हता. त्याचे देखील मला दु: ख होते. त्या वर्षातील सगळ्यात जास्त काळ हा मी इंटरनेटवर घालवला होता. 'लव आजकल' या चित्रपटातील माझी भूमिका आणि अभिनयामुळे मला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. दरम्यान, कार्तिक आर्यन आणि सारा अली खाननं 'लव आजकल' या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटा दरम्यान, ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले असे म्हटले जात होते. इतकंच काय तर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ट्रोलिंगवर काय बोलली सारा अली खान

पुढे ट्रोलिंग विषयी बोलताना सारा अली खान म्हणाली की, मला ट्रोलिंगचा फरक नाही पडला कारण जेव्हा आपण खासगी आयुष्यात आधीच कोणत्या वाईट परिस्थितीत असतो त्यामुळे अशात जर आपण ट्रोल होतो तर त्याचा फरक पडत नाहीत. 

हेही वाचा : प्रेमात धक्का अन् भावाच्या मित्रासोबत लग्न! आज 'ही' लोकप्रिय अभिनेत्री आहे Single Mother

साराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा 'अतरंगी रे' आणि 'सिम्बा' हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. तर तिनं दिलेल्या फ्लॉप चित्रपटांमध्ये 'लव आज कल' आणि 'कुली नंबर 1' हे चित्रपट आहेत. सारा लवकरच सारा अभिनेता विक्रांत मैसीसोबत 'गैसलाइट' या चित्रपटात दिसणार आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणारा हा तिचा दुसरा चित्रपट असणार आहे.