सारा अली खानला कोणी मारला धक्का?..साराचा चढला पारा

सेटवरून परतताना धक्का मारल्याने सारा भडकली आणि कुठलाही संवाद न साधता निघून गेली. साराचा हा व्हिडीओ चांगलाचा व्हायरल होतो आहे.

Updated: Apr 21, 2022, 03:50 PM IST
सारा अली खानला कोणी मारला धक्का?..साराचा चढला पारा title=

मुंबईः बॉलिवूडमधली एक हसतमुख चेहऱ्याची अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. सारा उत्तम अभिनेत्री तर आहेच मात्र एक चांगली व्यक्ती म्हणूनही तिची ओळख आहे. 

फोटोग्राफीसाठी माध्यमांना ती नेहमीच चांगला प्रतिसाद देते. हसतमुख चेहऱ्याने ती सर्वांशी संवाद साधते.

मात्र बुधवारी रात्री सेटवरून परतताना धक्का मारल्याने सारा भडकली आणि कुठलाही संवाद न साधता निघून गेली. साराचा हा व्हिडीओ चांगलाचा व्हायरल होतो आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

 सेटवरून परतत असताना माध्यमांनी साराला थांबवलं. फोटोसाठी विनंती करताना एका फोटोग्राफरचा साराला धक्का लागला. त्यामुळे साराचा मूड खराब झाला आणि सारा थेट गाडीत जाऊन बसली. खूप विनंती करूनही अखेर साराने फोटो काढण्यास नकार दिला.