लग्नानंतरही अभिनेत्याचे अनेक मुलींसोबत संबंध, पत्नीचा तो एक निर्णय आणि...

पतीवर विश्वास ठेवणं अभिनेत्रीला पडलं महागात, अनेक मुलींसोबत संबंध असूनही तिने पतीला माफ केलं, त्यानंतर मात्र...  

Updated: Mar 16, 2022, 12:39 PM IST
लग्नानंतरही अभिनेत्याचे अनेक मुलींसोबत संबंध, पत्नीचा तो एक निर्णय आणि... title=

मुंबई : एका टप्प्यावर प्रत्येकाच्या आयुष्यात खास व्यक्ती असतो. जो आपल्यासाठी सर्वात खास असतो. पण त्याचं व्यक्तीने आपली फसवणूक केली तर, त्यापेक्षा त्रासदायक आठवण नसू शकते. अभिनेत्री सारा खानच्या आयुष्यात देखील अशीचं एक व्यक्ती आली आणि तिला आयुष्यभराचं दुःख देवून गेली. साराच्या आयुष्यात आलेल्या त्या व्यक्तीचं नाव आहे अली मर्चेंट... 'लॉक अप' शोमध्ये साराने अलीसोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला. 

सारा आणि अली रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यामुळे शोमध्ये तिला विचारलं तुम्ही दोघे विभक्त का झाले? अशी कोणती परिस्थिती आली ज्यामुळे अली आणि तू असा टोकाचा निर्णय घेतला...

यावर सारा म्हणाली, 'आयुष्यात पहिल्यांदा मला कोणावर प्रेम झालं होतं. आम्ही एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पुढे गेल्यावर आमच्यात अनेक कारणावरून वाद झाले. पण मी नेहमी त्याला माफ केलं.. तो पुन्हा तिचं चूक करायचा...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'त्यानंतर मी आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही विभक्त झालो. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर मला कळालं की त्याचं अनेक मुलींसोबत अफेअर होतं... तेव्हा देखील मला असं वाटलं की तो परत असं काही करणार नाही... पण असं काही झालं नाही...'  

'आता मला त्याच्यासोबत मैत्री देखील ठेवायची नाही. तो समोर आला तरी मागच्या सर्व गोष्टी पुन्हा समोर येतील त्यामुळे पुन्हा तो माझ्या आयुष्यात नको आहे. कारण मी माझ्या आयुष्यात आता फार पुढे आली आहे. ' असं सारा म्हणाली.