मुंबई : माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल जाणून घ्यायला फार आवडते. ती काय करते? कुठे जाते? हे सारा नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळे तिचे चाहाते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.
आता देखील सारानं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. ही स्टोरीपाहून तिच्या चाहत्यांमध्ये अशी चर्चा सुरु आहे की, तिला तिचा बॉयफ्रेंड शुभमन गिलची तर आठवण येत नसावी ना?
खरंतर सारा तेंडूलकरणं आपल्या स्टोरीवर फोटो शेअर करताना ‘बस तेरा नाम दोहराए’ हे गाणं लावलं आहे. ज्यामुळे ती शुभमनसाठी असं म्हणतेय का अशी लोकांमध्ये चर्चा आहे.
परंतु असं काहीही नाहीय, साराने तिचा लंडनमधील फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने सफेद रंगाचा टॉप घातला आहे आणि हा फोटो शेअर करताना तिने 'बस तेरा नाम दोहराए' हे गाणं लावलं आहे.
खरंतर आपल्यापैकी जवळ-जवळ बरेच लोक कोणताही फोटो सोशल मीडिया स्टोरीवरती शेअर करताना त्याला गाणं लावतात. ज्यामुळे तो फोटो पाहाताना एक वेगळाच फिल येतो. तसंच काहीसं सारानं देखील केलं आहे.
आता यामागे साराला खरंच शुभमनची आठवण येतेय का? हे तिचं तिलाच माहित. परंतु सफेद टॉपमध्ये सारा खूपचं सुंदर दिसत आहे. तिची ही शैली सर्वांनाच अकर्षित करत आहे.