श्रीदेवीचा बुडून मृत्यू होऊ शकतो यावर विश्वास नाही : सरोज खान

शनिवारी रात्री अचानक अभिनेत्री श्रीदेवींच्या मृत्यूची बातमी थडकल्यानंतर बॉलिवूडसह तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

Updated: Feb 26, 2018, 07:14 PM IST
श्रीदेवीचा बुडून मृत्यू होऊ शकतो यावर विश्वास नाही : सरोज खान  title=

मुंबई : शनिवारी रात्री अचानक अभिनेत्री श्रीदेवींच्या मृत्यूची बातमी थडकल्यानंतर बॉलिवूडसह तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीने जगाचा निरोप घेतल्याने तिच्या अकाली मृत्यूचे नेमके कारण काय ? हे जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक आहे.

दुबईत मृत्यू - 

पुतण्याच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी परिवारासह अबु धाबीमध्ये गेल्या होत्या. लग्नसमारंभा मध्ये आनंदात असणार्‍या श्रीदेवींनी अचानक जगाचा निरोप घेतल्याने त्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

नेमका मृत्यू कशामुळे ? 

श्रीदेवी यांचा मृत्यू कार्डिएक अरेस्टने झाला असावा असा दावा सुरूवातीच्या काळात करण्यात आला होता. मात्र त्यानंतर दुबईत केलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मात्र श्रीदेवीच्या मृत्यूचे कारण बाथटबमध्ये पडून बुडून झाल्याची नवी माहिती देण्यात आली आहे.  

सरोज खान यांची प्रतिक्रिया 

अभिनेत्री आणि उत्तम नर्तिका असणार्‍या श्रीदेवीसोबत कोरिओग्राफर सरोज खान यांचे उत्तम संबंध होते. त्यांनी श्रीदेवीसोबत काम केल्यानंतर तिचा मृत्यू अशाप्रकारे होऊ शकतो यावर विश्वास नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. जर ती बाथटब पडली असती तर पाणीबाहेर आले असते. पण तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तसेच पोलिस अहवालामध्ये समोर आलेल्या गोष्टींवर विश्वास बसत नसल्याची माहिती सरोज खान यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत दिली आहे.