Sarsenapati Hambirrao Teaser : परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाचं तिखट...

सरसेनापती हंबीरराव' सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस   

Updated: Dec 18, 2021, 12:58 PM IST
Sarsenapati Hambirrao Teaser : परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाचं तिखट... title=

मुंबई : 'स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सुर्या सारखंय, ते कायम धगधगतचं रहायला पाहिजे...' अशी सुरूवात करत बहुप्रतीक्षित 'सरसेनापती हंबीरराव' सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्याला अनेकदा परकिय अक्रमनांचा सामना करावा लागला. पण महाराज्यांच्या मावळ्यांनी कधी  हार मानली नाही. त्यांनी फक्त विजयाकडे लक्ष्य केंद्रीत केलं. 

अशात, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती होण्याचा मान हा 'हंबीरराव मोहिते' यांना मिळाला.  'परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाचं तिखट' हे वाक्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळणार आहे. 

इतिहासात हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास काही तुकड्यांमध्ये अनुभवला आहे. तसेच झी मराठीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील हंबीर मामा देखील प्रेक्षकांनी अनुभवले. मात्र आता हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.