छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

आर्थिक चणचण जाणवत होती

Updated: Nov 24, 2020, 12:42 PM IST
छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

मुंबई : खूप काळापासून किडनीच्या त्रासाने त्रस्त असलेले अभिनेते आशीष रॉय (Ashiesh Roy) यांच मंगळवारी निधन (Died) झालं आहे. ओशिवरा येथे राहत असलेले ५४ वर्षीय आशीष रॉय यांनी अखेरचा श्वास घेतला. 'ससुराल सिमर का'(Sasural Simar Ka) ,'ब्योमकेश बक्शी', 'जीनी और जीजू सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 

जया भट्टाचार्य आणि झूमा मित्रा यांच्याप्रमाणे अनेक कलाकार ज्यांचे आशीष रॉय यांच्याशी मित्रासारखे संबंध होते. ते कुटुंबियांच सांत्वन करायला गेले आहेत. आशीष यांना तब्बेत बिघडल्यामुळे ICU मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर आशीष रॉय यांनी इंडस्ट्रीकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. 

आशीष यांनी सुपरस्टार सलमान खानकडे देखील मदतीची मागणी केली होती. टीना घई, सूरज थापर, बीपी सिंह, हबीब फैजल सारख्या अनेकांनी मदत केली आहे. आशीष रॉय ओशिवऱ्याच्या घरी एकटेच राहत असतं. त्यांच्या बहिणी कोलकातामध्ये राहत असतं. 

आशीष रॉय यांना दोनवेळा पॅरालाइसिसचा अटॅक येऊन गेला. लॉकडाऊन दरम्यान रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना त्यांच्या घरीच ठेवण्यात आलं. त्यांच डायलसिस चालत असे. आर्थिक मदतीसाठी त्यांनी आवाहन केलं होतं.