'नर नारीचे मिलन घडता', सवाल- जवाबाची अशी फक्कड लावणी तुम्ही पाहिलीच नसेल

महाराष्ट्रातील लोककलेमध्ये मानाचं स्थान असणाऱ्या याच लावणीला चित्रपट जगतामध्येही तितकंच महत्त्वं देण्यात आलं.   

Updated: Apr 26, 2022, 06:09 PM IST
'नर नारीचे मिलन घडता', सवाल- जवाबाची अशी फक्कड लावणी तुम्ही पाहिलीच नसेल title=
चंद्रमुखी

मुंबई : ढोलकीवर थाप पडल्यानंतर होणारा आवाज सर्वांच्याच काळजाचा ठाव घेतो. त्यातही ही ढोलकी एखाद्या लावणीला आणि लावण्यवतीला साथ देत असेल तर, तो क्षण शब्दांतही व्यक्त करता येणार नाही असाच असतो. महाराष्ट्रातील लोककलेमध्ये मानाचं स्थान असणाऱ्या याच लावणीला चित्रपट जगतामध्येही तितकंच महत्त्वं देण्यात आलं. 

अगदी कृष्णधवल रंगांचट्या चित्रपटांपासून ते आतापर्यंत लावणीची जादू आपण पाहिली आहे. त्यातच आता भर टाकत आहे, आगामी चित्रपट 'चंद्रमुखी'. राजकारण आणि लावणी कलेची सांगड घालत एक सुरेख कथानक या चित्रपटाच्या निमित्तानं साकारण्यात येत आहे. (Sawal Jawab Song | Chandramukhi | Marathi Song)

अवघ्या काही दिवसांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असणाऱ्या या चित्रपटातील नवं गाणं, अर्थात सवाल- जवाबाची लावणी नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. प्रेमाच्या नात्याची एक वेगळी बाजू यानिमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे. (Amruta Khanvilkar video)

अभिनेत्री अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी यांच्या तडफदार लावणी नृत्याची झलक या सवाल- जवाबात पाहायला मिळत आहे. मधुरा दातार आणि प्रियांका बर्वे यांनी ही लावणी गायली असून, साथीदारांनीही त्यांना सुरेख साथ दिली आहे. 

फडावर लावणी सुरु असताना एकमेकिंसमोर उभ्या असणाऱ्या लावण्यवती कशा प्रकारे एकमेकिंना सवाल जवाबाच गुंतवतात आणि खऱ्याखुऱ्या आयुष्यातील प्रसंगांचे संदर्भ देत कशी ही कला सादर करतात याची सुरेख झलक या गाण्यातून पाहता येत आहे. 

आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओक यानं केलं आहे. तर, अजय- अतुल या जोडीनं चित्रपटाला संगीत दिलं आहे. हा सांगितीक नजराणा प्रेक्षकांना 29 एप्रिलपासून चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहे.