सर्वोच्च न्यायालयाकडून 'पीएम मोदी' चित्रपटाला हिरवा कंदील

चित्रपटाबद्दल दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांना सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्णविराम देण्यात आला आहे.

Updated: Apr 9, 2019, 01:42 PM IST
सर्वोच्च न्यायालयाकडून 'पीएम मोदी' चित्रपटाला हिरवा कंदील title=

मुंबई : 'पीएम मोदी' चित्रपट गेल्या काही दिवसांपासून भलताच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून चित्रपटाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. चित्रपटाबद्दल दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांना सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्णविराम देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोणतेही भाष्य करण्यास नकार दिलेला आहे. निवडणूक आयोगाने पुढील निर्णय घ्यावा, असे सांगत न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे सोपावली आहे.

निवडणुकीच्या काळात आचार संहिता उल्लंघन होतयं की नाही, याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाकडून मोकळा झाला आहे. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे चित्रपटाचे निर्माते आणि प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

सिनेमा गुजरातच्या वेग-वेगळ्या भागांमध्ये चित्रित करण्यात आला आहे. चित्रपटात दर्शन कुमार, बोमन ईरानी, जरीना वहाब, मनोज जोशी, प्रशांत नारायण, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अक्षत आर सलूजा, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता आणि यतिन कर्येकर यांसारखे दिग्गज कलाकार रूपेरी पद्यावर दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक ऑबेरॉय आणि ओमंग कुमार यांनी केले आहे.