सारा अमेरिकेत घेत आहे सुट्ट्यांचा आनंद

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या सुट्टांचा आनंद घेताना दिसत आहे.

Updated: Apr 9, 2019, 12:01 PM IST
सारा अमेरिकेत घेत आहे सुट्ट्यांचा आनंद title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या सुट्टांचा आनंद घेताना दिसत आहे. तिने नुकताच तिच्या आगामी 'लव आज कल २' चित्रपटाचे शुटिंग पुर्ण केले आहे. मागील काही दिवसांपासुन सारा आणि कार्तिक भलतेच चर्चेत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच त्यांच्या चर्चांना उधान आलेले असते. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत ती अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंत आहे. तिने स्वत:चे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला हा फोटो अमेरिकेतील व्हिटनी संग्राहलयातील आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सारा मॅनहटनच्या एका पंचतारांकित हॉटेल मध्ये राहत आहे. पापराजींच्या नजरेतून लांब सारा तिच्या मित्रांसोबत अमेरिका फिरत आहे.

'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या साराने अल्पावधीतच चाहत्यांची मने जिंकली. तर तिच्या 'सिम्बा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. आता तिचा तीसरा चित्रपट चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. 'लव आज कल २' चित्रपटाच्या माध्यमातून कार्तिक आणि सारा पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. 

अभिनेता रणदीप हुड्डा सुद्धा चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'लव आज कल २' चित्रपट 'लव आज कल' सिनेमाचा सिक्वल असणार आहे. 'लव आज कल' सिनेमा १० वर्षांआधी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.