मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला आमिर खान आणि झायरा वसीम स्टारर 'सीक्रेट सुपरस्टार' पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर मागे पडलाय. तर दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'गोलमाल अगेन' या चित्रपटानं या आठवड्यात बाजी मारलेली दिसतेय.
कौतुकास्पद विषय आणि मांडणी असतानाही 'सिक्रिटे सुपरस्टार'ला रोहीत शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन'नं मात दिलीय. पहिल्याच आठवड्यात 'गोलमाल अगेन'नं जगभरातील स्क्रिनवर १६४ करोड रुपयांपेक्षा जास्त कमाई केलीय तर 'सिक्रेट सुपरस्टार'नं गुरुवारपर्यंत जवळपास ६६.९६ करोड रुपयांची कमाई केलीय.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर खानच्या सीक्रेट सुपरस्टारनं गुरुवारपर्यंत परदेशात जवळपास २५.३७ करोड रुपयांची कमाई केली तर भारतीय बाजारात या सिनेमानं १.५९ करोडोंची कमाई गोळा केली. सीक्रेट सुपरस्टार गेल्या आठवड्यात गुरुवारी प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमानं ४.८० करोड रुपयांची कमाई केली होती. आमिरच्या 'दंगल'नं आपल्या पहिल्याच दिवशी जेवढी कमाई (३० करोड) केली होती तेव्हढी कमाई करण्यासाठी 'सिक्रेट सुपरस्टार'ला चार दिवस लागले.
#SecretSuperstar Thu 4.80 cr, Fri 9.25 cr, Sat 8.55 cr, Sun 8.50 cr, Mon 3.05 cr, Tue 2.75 cr, Wed 2.40 cr, Thu 2.29 cr. Total: ₹ 41.59 cr.
— taran adarsh (@taran_adarsh) October 27, 2017
#SecretSuperstar - OVERSEAS - Total till Thursday, 26 October 2017: $ 3.9 million [₹ 25.37 cr].
— taran adarsh (@taran_adarsh) October 27, 2017
Diwali has brightened the scenario... The Week 1 *combined biz* of #GolmaalAgain and #SecretSuperstar is a HUGE ₹ 177.66 cr... India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) October 27, 2017