सीरियल किसर इमरान हाशमीने 'या' कारणामुळे किसिंग सीन करणं सोडलं

इमरानने सांगितलं खरं कारण 

Updated: Mar 25, 2021, 07:34 AM IST
सीरियल किसर इमरान हाशमीने 'या' कारणामुळे किसिंग सीन करणं सोडलं  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना त्यांच्या एका खास गोष्टीमुळे ओळखलं जातं. त्यांच्या भूमिकेतील वेगळेपण ओळखून चाहते त्या कलाकाराला ओळखतात. त्याला त्याचा टॅग लागला जातो. असंच काहीस अभिनेता इमरान हाशमीसोबत (Serial Kisser Emraan Hashmi) घडलं आहे. इमरान हाशमी हा बॉलिवूडमधील ट्रेंड सेटर अभिनेता (Why Emraan Hashmi stopped kissing Scene) म्हणून ओळखला जातो. 

इमरान हाशमीची अशी ओळख आहे की,"जर तो सिनेमात असेल तर त्या सिनेमात कोणता इंटिमेट सीन नसला तराही किसिंग सीन तर नक्कीच असेल.' चाहते देखील इमरानच्या किसिंग सीनचे दिवाने आहेत. 

सिनेमात अतिशय बोल्ड आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असा किसिंग सीन देणारा अभिनेता एकाऐकी हे करणं टाळू लागला. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला की, इमरान हाशमी आता सिरियल किसर राहिला नाही. 

इमरान हाशमीचा जन्म 24 मार्च 1979 मध्ये मुंबईत झाला. 2002 मध्ये 'राज' सिनेमाचा असिस्टंट डिरेक्टरची भूमिका सांभाळत त्याने करिअरला सुरूवात केली. 2003 मध्ये 'फूटपाथ' या सिनेमातून त्याने आपल्या करिअरला सुरूवात केली. मर्डर, जहर, आशिक बनाया आपने, चॉकलेट, कलयुग, गँगस्टर, अक्सर,  गुड बॉय बेड बॉय, आवारापन, द ट्रेन, राज, जन्नत, क्रूक, वन्स अपऑन अ टाइम इन मुंबई, मर्डर 2, जन्नत 2 आणि द डर्टी पिक्चर सारख्या सिनेमांत काम केलं आहे. 

मात्र हळू हळू असं चित्र समोर आलं की इंटिमेट सीन आणि किसिंग सीन देणार इमरान हाशमी हे सगळं टाळू लागला. आजही त्याचा हा टॅग पूर्णपणे निघालेला नाही मात्र त्याने किसिंग सीन देणे पूर्णपणे बंद केले आहेत. 

आतापर्यंत तो संघाई, एक थी डायन, घनचक्कर, उंगली, हमारी अधूरी कहानी, अजहर, बादशाहो, वेलकम टू न्यूयॉर्क, व्हाए, चीट इंडिया, मुंबई सागा आणि द बॉडी सारख्या सिनेमांत दिसला आहे. या सिनेमात किसिंग सीन फारच कमी दिसले. यापुढे इमरान चेहरे, गंगुबाई कातियावाडी आणि एजरा सारख्या सिनेमात दिसणार आहे. 

आता इमरान हाशमीला असं वाटतं की, किसिंग सीनची व्हॅल्यू कमी झाली आहे. काही वर्षांपूर्वी लोकं या विरुद्ध बोलत होते. मात्र आता ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. तसेच सिनेमा कितीही चांगला असू दे पण हायलाइट फक्त किसिंग सीनच होतात, ही गोष्ट इमरानला पटली नाही. 

इमरानने 2006 साली परवीन साहनीसोबत लग्न केलं. इमरान आपलं खासगी आयुष्य खूप पर्सनल ठेवतो. इमरानला एक मुलगा देखील आहे ज्याचे फोटो तो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतो. महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा लागतात.