वयाच्या 23 व्या वर्षी 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं कृष्णभक्तीसाठी अभिनयाला ठोकला रामराम

Actress Left Industry : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं कृष्णभक्तीचा मार्ग निवडल्याचे सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 10, 2023, 02:41 PM IST
वयाच्या 23 व्या वर्षी 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं कृष्णभक्तीसाठी अभिनयाला ठोकला रामराम title=
(Photo Credit : Social Media)

Actress Left Industry : गेल्या काही दिवसांपूर्वी आपण हे पाहिलं की अनेक सेलिब्रिटी हे त्यांच्या धर्मासाठी चित्रपटसृष्टी सोडताना दिसत आहेत. धर्मासाठी ग्लॅमरचं क्षेत्र सोडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये बरखा मदान, झायरा वसीम, सोफिया वसीम, सना खान यांची नावं आहेत. हे कलाकार अभिनय क्षेत्र सोडून धर्माच्या मार्गावर पुढे आले आहेत. त्यात आता एक मराठमोळी अभिनेत्रीनं धर्मासाठी अभिनय क्षेत्र सोडलं आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून 'अनुपमा' या लोकप्रिय मालिकेत काम करणारी अनघा भोसले आहे. अनघानं वयाच्या 23 व्या वर्षी कृष्णभक्त होत अभिनय क्षेत्राला रामराम केला आहे. 

अनघानं गेल्यावर्षी 24 मार्च 2022 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं अभिनय क्षेत्र सोडत कृष्णभक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ‘हरे कृष्ण.. मी अनुपमा या मालिकेत दिसत नसल्यानं तुम्ही सर्वांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली हे मला माहितीये. मला भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार. ज्यांना माहित नाही, त्यांना मी या पोस्टद्वारे कळवू इच्छिते, मी फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्री सोडली आहे. माझ्या या निर्णयाचा तुम्ही आदर करावा आणि माझी साथ द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे. मी अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यात्माविषयी असलेल्या श्रद्धांमुळे मी हा निर्णय घेतला आहे. तुम्ही सगळे आपआपले कर्म करत राहाल आणि जे तुम्हाला भगवान श्रीकृष्णापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांच्यापासून स्वत: दूर व्हाल हे मला माहित आहे’, असं तिने लिहिलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : साऊथचा सुपरस्टार पवन कल्याण रस्त्यावरच झोपला, पण ही वेळ का आली?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनघानं 'अनुपमा' या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारली होती. खरंतर अनघा ही तिच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली होती. 23 व्या वर्षी अनघानं कृष्णभक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. अनघाच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. शुटिंगमुळे भक्तीसाठी वेळ मिळत नसल्याचं तिने सांगितलं. आता ती पूर्णवेळ कृष्णभक्तीत मग्न असते. ती सतत सोशल मीडियावर कृष्णाचे फोटो शेअर करताना दिसते. अनघा आता गोवर्धन इकोव्हिलेज या संस्थेसाठी काम करते. जी कृष्णभक्तांसाठीच बनली आहे. ती सध्या वृंदावन येथे असते. मात्र तिने तिच्या कुटुंबापासून लांब झालेली नाही.