Aryan Khan NCB Arrest : आर्यन खानची आजही सुटका नाहीच; बुधवारपर्यंत कोठडीत वाढ

शाहरुखची डोकेदुखी वाढली

Updated: Oct 11, 2021, 12:53 PM IST
Aryan Khan NCB Arrest : आर्यन खानची आजही सुटका नाहीच; बुधवारपर्यंत कोठडीत वाढ  title=
आर्यन खानच्या अडचणींत वाढ

मुंबई : क्रूज शिप ड्रग्स पार्टी (Mumbai Drug Bust Case) प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अडचणी दर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. आर्यनची सुटका आतातरी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख बुधवारपर्यंत लांबवण्यात आली आहे. ज्यामुळं आर्यनच्या न्यायालयीन कोठडीत बुधवारपर्यंतची वाढ झाली आहे.

यापूर्वी आर्यनसाठी सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. पण, एनसीबीनं चौकशी प्रक्रियेसाठी वेळ हवा असल्याचं कारण पुढे करत आर्यनची कोठडी वाढवून मागितली होती. सध्या सदर प्रकरणी तपास सुरु असून, सुनावणी दसऱ्याच्या नंतरच ठेवण्यात यावी अशा आग्रही भूमिकेत एनसीबी दिसली. अमित देसाई यांच्या म्हणण्यानुसार ताब्यात असणाऱ्या तिघांपैकी आर्यन एकमेव असा व्यक्ती आहे, ज्याच्याकडे काहीच (ड्रग्ज) सापडले नाहीत. ज्यासाठी 7 दिवसांचा कालावधी योग्य नाही. या साऱ्यामुळं आता आर्यनच्या अटक प्रकरणाची सुनावणी 13 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास होणार आहे.

आर्यनचा जामीन अर्ज यापूर्वीही फेटळाण्यात आला होता. ज्यावर त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यास उच्च न्यायालयात यासाठीही दाद मागू असा इशारा आर्यनचे वकील सचिन मानेशिंदे यांनी दिला. शुक्रवारीच आर्यनसह मुनमुन दमेचा आणि अरबाज मर्चंट यांचेही जामीन अर्ज फेटाळले होते.

दुसरीकडे एनसीबीच्या वतीनं सादर झालेल्या ASG अनिल सिंह यांनी  म्हटल्यानुसार, हे एक असं प्रकरण आहे ज्यामध्ये जवळपास 17 जणांचं नाव गोवलं गेलं आहे. या प्रकरणीच्या समूळ तपासाची आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यामुळं साक्षीदारांना सोडल्यास काही गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला जाण्याची शक्यता आहे. सध्यापर्यंतच्या तपासातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळं या टप्प्यावर कोणाचीही सुटका करणं तपासात अडथळे निर्माण करु शकते.