शाहरुख खानला झटका, 'या' व्यक्तीने कॉल न उचलल्याने फेकला फोन

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान बऱ्याच काळापासून हिट सिनेमांच्या शोधात होता. 

Updated: Sep 23, 2021, 08:26 AM IST
 शाहरुख खानला झटका, 'या' व्यक्तीने कॉल न उचलल्याने फेकला फोन

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान बऱ्याच काळापासून हिट सिनेमांच्या शोधात होता. त्याच्यासह सर्व कलाकारांनी OTTवर पदार्पण केले आहे. परंतु या प्लॅटफॉर्मवर अभिनेता म्हणून त्याचा कोणताही चित्रपट आला नाही. किंग खानने लवकरच ओटीटीमध्ये प्रवेश करावा अशी चाहत्यांची इच्छा आहे.

आजकाल शाहरुखची एक जाहिरात बरीच चर्चेत आहे. ही जाहिरात डिस्ने प्लस हॉटस्टारची आहे ज्यात अभिनेता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी अभिनेता राजेश जैससोबत मजेदार चर्चा करत असतात. काही दिवसांपूर्वी ही जाहिरात रिलीज झाली होती आणि आता नवीन भाग देखील याच भागात प्रदर्शित झाला आहे.

चाहत्यांची घराखाली गर्दी
 
नवीन जाहिरातीत शाहरुखने फोन त्याच्या घराच्या बाल्कनीतून खाली फेकला. ही मजेदार जाहिरात हॉटस्टारने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. यामध्ये शाहरुखचे चाहतेही त्याच्या नावाचा बॅनर हातात घेताना दिसत आहेत.

शाहरुख खानचा उचलला जात नाही फोन 

चाहत्यांचा हा आदर पाहून 'बॉलीवूडचा बादशाह' त्यांना हात दाखवतो आणि राजेशला विचारतो की त्याला डिस्ने प्लस हॉटस्टारचा फोन आला का? हे ऐकून राजेश म्हणतो की तो आला नाही. मग शाहरुख म्हणतो तू फोन केलास का? यावर राजेश म्हणतो की त्याने केले, उचलले नाही. याचा अर्थ ते आयपीएल, 20-20 विश्वचषक आणि नवीन चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. यानंतर राजेश त्याचा फोन बघतो आणि म्हणतो की सर, त्याचा मेसेज आला आहे.