15 व्या वर्षातील करीनाचं अल्लड प्रेम; प्रियकराला भेटण्यासाठी करायची प्रयत्न पण...

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याती इच्छा

Updated: Sep 23, 2021, 08:17 AM IST
15 व्या वर्षातील करीनाचं अल्लड प्रेम; प्रियकराला भेटण्यासाठी करायची प्रयत्न पण...

मुंबई : झगमगत्या विश्वात कलाकारांचे चित्रपट आणि चित्रपटाच्या कथेबाबत कायम चर्चा होत असते. एवढंच नाही तर एखादा कलाकार प्रसिद्धीझोतात येवू लागला तर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील एका रात्रीत वाढते. त्यानंतर आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांच्या मनात जन्म घेते. तेव्हा चॉट शोमध्ये लोकप्रिय कलाकारांना त्याच्या खासगी आयुष्याबद्दल विचारलं जातं. असचं काही अभिनेत्री करीना कपूर खानसोबत देखील झालं आहे. 

एका मुलाखतीत खुद्द करीनाने सांगितलं होतं की वयाच्या 15 व्या वर्षी मी एका मुलाच्या प्रेमात पडले होते. शाळेत एकत्र शिकत असताना करीना आणि तिला आवडणारा मुलगा एकाचं वर्गात होते. तेव्हा करीना त्या मुलाच्या प्रेमात पडली होती. ती कायम त्याच्यासोबत एकत्र वेळ व्यतीत करण्याच्या तयारीत असायची. अनेक वेळा करीनाने फोनवरूनच प्लॅनिंग करत त्याला भेटायला गेली.

या गोष्टीचा अंदाज जेव्हा करीनाची आई बबिता यांना आला. तेव्हा करीनाच्या खोलीतील फोन बंद करण्यात आला. करीना आईला न सांगता त्या मुलाला भेटायची त्यामुळे तिला खोलीत बंद करण्यात आलं. पण चाकूने दार उघडत तीने घरातून पळ काढला. करीनाचा असा हट्टी पणा पाहाता तीला हॉस्टेलमध्ये पाठविण्याचा निर्णय तिच्या आईने घेतला. 

एकंदर पाहाता, कलाविश्वात येण्याआधीपासून तिच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगत होत्या. कलाविश्वात अनेक अभिनेत्यांसोबत करिनाचं नाव जोडण्यात आलं. पण अभिनेता शाहीद कपूर आणि करीनाच्या नत्याची चर्चा तुफान रंगली. पण हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर करीना आणि सैफ अली खान एकमेकांच्या जवळ आले. महत्त्वाचं म्हणजे लग्न करण्यापूर्वी सैफिना लिव्हइन मध्ये राहत होते. त्यांना लिव्हइनमध्ये राहण्याची परवानगी करीनाच्या आईने दिली होती.