शाहरूखला खासगी कारणामुळे बंद कराव लागलं शुटिंग, गौरी कारण ठरली आणि...

कोणाला कळालचं नाही 'परदेस' सिनेमात शाहरुख नाही, त्याच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीने बजावली भूमिका, कारण...  

Updated: Feb 22, 2022, 02:36 PM IST
शाहरूखला खासगी कारणामुळे बंद कराव लागलं शुटिंग, गौरी कारण ठरली आणि... title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खान गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. 1992 साली प्रदर्शित झालेल्या 'दिवाना' सिनेमातून शाहरुखने बॉलिवूडमध्ये पदापर्पण केलं. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. शाहरुखने 'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'करण-अर्जुन', 'दिल तो पागल है' यांसरख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि बॉलिवूडला रोमान्सचा बादशाह भेटला. 

शाहरुख आजही चाहत्यांच्या मनात राज्य करतो. पण 1997 साली प्रदर्शित झालेल्या 'परदेस' सिनेमाने प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं. सिनेमातील एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की, सिनेमाचा काही भाग शाहरूखने नाही तर त्याच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीने पार पाडला आहे. 

जेव्हा शाहरुख 'परदेस' सिनेमाचं शुटिंग करत होता, तेव्हा पत्नी गौरी खान प्रेग्नेंट होती. 1997 साली 'परदेस' सिनेमाचं शुटिंग जवळपास पूर्ण झाली होती. शेवटच्या गाण्याचा काही भाग बाकी होता. 

तेव्हा गौरीच्या गर्भधारणे दरम्यान गुंतागुंत झाली होती. त्यामुळे सिनेमाची शुटिंग सोडून तो दिल्लीत परतला. तेव्हा शाहरुख 'ये दिल दिवाना' गाण्याचं शुटिंग पूर्ण करत होता. 

पण पत्नीसाठी दिल्लीत आलेल्या शाहरुखला गाण्याचं शुटिंग पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे गाण्याचा राहिलेला भाग हूब दिसणाऱ्या व्यक्तीने शूट केला.