सडपातळ शरीर, डोळ्यांवर चष्मा, मुलींसारखे केस! Backround Dancer कसा झाला बॉलिवूडचा सुपरस्टार

Shahid Kapoor in Taal: अनेक अभिनेते हे आपल्या बॉलिवूडच्या करिअरची सुरूवात ही छोट्या मोठ्या कामांनी करतात. मग कुठे जाऊन त्यांना हळूहळू काम मिळते आणि मग ते यशस्वी चित्रपट करताना दिसतात. सध्या अशाच एका चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. तो म्हणजे कबीर सिंग परंतु या चित्रपटाचा हिरो हा बॅकराऊंड डान्सरही होता, याबद्दल त्यानंच खुलासा केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 9, 2023, 12:07 PM IST
सडपातळ शरीर, डोळ्यांवर चष्मा, मुलींसारखे केस! Backround Dancer कसा झाला बॉलिवूडचा सुपरस्टार title=
June 9, 2023 | Shahid Kapoor recalls shooting with Aishwarya Rai Bachchan old photos goes viral (Photo: DNA.Com)

Shahid Kapoor in Taal: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या करिअरची सुरूवात ही छोट्या छोट्या कामांपासून केली होती. म्हणजेच अगदी छोट्या भुमिकांपासून ते बॅकराऊंड डान्सरपर्यंत. अनेक अभिनेत्यांना आपल्या करिअरच्या सुरूवातीला अशी कामं केली आहेत परंतु आता ते बॉलिवूडचे सर्वात मोठे आणि लोकप्रिय सुपरस्टार झाले आहेत. तेव्हा त्यांच्या अभिनयाची अनेकदा चर्चा होते. परंतु त्यांच्या पहिल्या कामाबद्दलही अनेकदा चर्चा होते. या सुपरस्टारर्स पहिले काम कोणते होते याबद्दल त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेली असते. आज आम्ही अशाच एका सुपरस्टारबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या अभिनयाची चांगलीच चर्चा होताना दिसते. कधीकाळी हा सुपरस्टार एका लोकप्रिय चित्रपटात बॅकराऊंड डान्सर म्हणून होता. 

तुम्हाला आत्तापर्यंत अंदाज आलाच असेल की आम्ही कोणत्या कलाकाराबद्दल बोलतो आहोत. या कलाकाराचे नावं दुसरे तिसरे कोणतेही नसून तुमचा लाडका कबीर सिंग म्हणजे शाहीद कपूर आहे. शाहीद कपूर यानं 1999 साली आलेल्या 'ताल' या चित्रपटातून ऐश्वर्या राय बच्चनसोबत एका गाण्यावर डान्स केला होता. परंतु यात तो बॅकराऊंड डान्सर म्हणून होता. तेव्हा त्याचीही बरीच चर्चा रंगली होती. परंतु त्याबद्दल खुद्दस शाहीद कपूरचं खुलासा केला आहे. रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत शाहीद कपूर यानं त्या गाण्याबद्दल आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. ते गाणं होतं, कहीं आग लगें लाग जाए. जेव्हा शाहीद हा टीएजर होता.

याबद्दल तो म्हणतो की, कोणालाही याबद्दल माहिती नव्हते. परंतु त्या दिवशी माझ्यासोबत एक अपघात झाला. मी माझी मोटरसायकल चालवायचो तेवढ्यात मी त्यावरून पडलो आणि मला दुखापत झाली. तेव्हा त्याच अवस्थेत मी सेटवर गेलो होतो, हे मला चांगलंच आठवतं आहे. तेव्हा मला असं वाटलं अरे, हे आपल्यासोबत आज काय घडलं? हे माझ्यासोबत तेव्हा घडलं होतं. माझ्या आयुष्यातील चांगले आणि वाईट दिवस मला आठवतात. फक्त 'ताल'च नाही तर करिश्मा कपूरच्या 'दिल तो पागल हैं' या चित्रपटातही त्यानं बॅकराऊंड डान्सरचे काम केले होते. त्याबद्दल तो म्हणाला की, त्या गाण्याबद्दल माझ्या काही चांगल्या आठवणी नाहीत. माझे केस हे बाऊंन्सी होते. मी तेव्हा खूपच नर्व्हस होतो. मी गोष्टी बिघडवायचो. 

हेही वाचा - OMG! कपाळी भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ; जटाधारी रुपातील 'या' अभिनेत्याला पाहून अंगावर काटा

हाच शाहीद कपूर आता बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट गाजले आहेत. करीना कपूर आणि त्यांच्या डेटिंगच्याही अनेकदा चर्चा रंगल्या होत्या.