"तिला जरासाही अभिनय येत नाही", काम्या पंजाबीचा Sonakshi Sinha ला टोला

Kamya Panjabi On Sonakshi Sinha :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबीनं नुकतीच एक वेब सीरिज पाहिली होती. ही वेब सीरिज पाहता तिनं हे मोठं वक्तव्य केलं आहे. अशात काम्यानं केलेल्या या वक्तव्यानंतर सगळ्यांना ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून सोनाक्षी आहे असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 9, 2023, 11:43 AM IST
"तिला जरासाही अभिनय येत नाही", काम्या पंजाबीचा Sonakshi Sinha ला  टोला title=
(Photo Credit : Kamya Panjabi / Sonakshi Sinha Instagram)

Kamya Panjabi On Sonakshi Sinha :  छोट्या पडद्यावरील अभिनेत्री काम्या पंजाबी ही तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. काम्या सोशल मीडियावर अनेक गोष्टींवर तिला वाटतं ते स्पष्टपणे बोलताना दिसते. नुकतीच काम्यानं ‘दहाड’ ही वेब सीरिज पाहिली. त्यानंतर काम्यानं सोनाक्षी सिन्हावर निशाना साधला आहे. तिला ही वेब सीरिज पाहून जे काही वाटले त्याविषयी तिनं तिचं मत मांडलं आहे. यावेळी काम्यानं सोनाक्षीचं नाव घेतलं नाही पण तिच्या वक्तव्याला पाहून तिनं सोनाक्षीवर कमेंट केली आहे. 

रिपोर्ट्सनुसार, काम्यानं सांगितलं की ओटीटीवरील असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच काम नीट करत नाहीत. सोनाक्षीचं नाव न घेता काम्यानं एका वेब सीरिजचं उदाहरण देत सांगितले की मोठ्या कलाकाराची मुलगी आहे जिनं तिच्यासोबत ओटीटी डेब्यू केला आहे. तर तिनं ही सीरिज पाहण्यास सुरुवात केली. पहिल्या एपिसोडच्या पुढे तिला ती सीरिज पाहण्याची इच्छा झाली नाही. एका मोठ्या कलाकाराची मुलगी चांगला अभिनय देखील करू शकत नाही. तर काम्यानं यावेळी निर्माते आणि कास्टिंक डायरेक्टर यांना देखील सवाल केले आहेत. काम्या म्हणाली की “ओटीटीवर असे अनेक कलाकार आहेत ज्यांना अभिनयातील ‘अ’ देखील येत नाही. माफ करा… मी त्यांचे नाव घेणार नाही. नुकतीच मी एक सीरिज पाहत होते ज्यात एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या मुलीने पदार्पण केले आहे. पण, मी एकही एपिसोड नीट पाहिला नाही. त्या मुलीला अजिबात अभिनय करता येत नव्हता, परंतु यावर कोणीच काही बोलू शकत नाही, कारण ती एका मोठ्या स्टारची मुलगी आहे.”

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी 'या' अभिनेत्याला अटक

याविषयी सांगताना काम्या म्हणाली, निर्माते नावारुपात आलेले कलाकार, स्टार किड्ट आणि लोकप्रिय कलाकारांना या साठी कास्ट करतात, कारण त्यांची इच्छा असते की त्यांचा प्रोजेक्ट विकला जाईल पण त्यांना कळत नाही की त्यांच्यात टॅलेन्ट नाही. रिपोर्ट्सनुसार, काम्या पंजाबी म्हणाली, की ती मुद्दामून ओटीटीपासून लांब आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी ती टिव्हीवरील करिअरवर पाणी सोडणार नाही. याविषयी काम्या पुढे, म्हणाली "मी अशी नाही की बोलेल मला चित्रपट आणि ओटीटीच्या जगात यायचे आहे. मला टिव्ही जास्त आवडतं आणि हीच माझी प्रायोरिटी आहे. माझं पहिलं प्रेम हे टीव्ही आहे." खरंतर काम्याचें हे वक्तव्य पाहता ती दुसरी कोणी नसून सोनाक्षी विषयी बोलत आहे असे म्हटले आहे. पण काम्यानं सोनाक्षीचं नाव घेतलं नाही.