शहनाज गिलचा व्हिडिओ व्हायरल, पाहून तुमचेही डोळे पाणावतील

शहनाज गिलने तिच्या स्टाईलने आणि निरागसतेने सगळ्यांची मने जिंकली आहेत.

Updated: Dec 2, 2021, 04:16 PM IST
शहनाज गिलचा व्हिडिओ व्हायरल, पाहून तुमचेही डोळे पाणावतील

मुंबई : शहनाज गिलने तिच्या स्टाईलने आणि निरागसतेने सगळ्यांची मने जिंकली आहेत. बिग बॉस 13 मधून लोकप्रिय झालेली शहनाज आज चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. शहनाज आणि सिद्धार्थच्या जोडीचं लोकांनी खूप कौतुक केलं होतं. तर सिद्धार्थच्या मृत्यूनंतर तिचं सामाजिक जीवनापासून दुरावलं होतं. त्याचबरोबर बऱ्याच दिवसांनंतर शहनाज सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. शहनाज अमृतसरच्या पिंगलवाडा भागातील एका अनाथाश्रमात गेली होती. जिथे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

मुलांना भेटून आनंद झाला
नुकताच सोशल मीडियावर शहनाज गिलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी ती अमृतसरच्या पिंगलवाडा भागातील एका अनाथाश्रमात पोहोचल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती ईथे पोहोचताच तिच्या चाहत्यांनी तिला मिठी मारली. यावेळी शहनाजदेखील खूप आनंदी दिसत होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shehnaaz Gill Fanpage (@shehnaazgillfb)

नुकतीच लंडनहून परतली
शहनाज गिलच्या 'हौसला राख' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ती लंडनला गेली होती. तिथून परतताच ती मुलांना भेटण्यासाठी अनाथाश्रमात पोहोचली.