शाहरूख-कजोलच्या जोडीला रिप्लेस करणार आराध्या-अबराम

शाहरूखच्या या वक्तव्यावर बिगबींची प्रतिक्रिया  

Updated: Jun 12, 2020, 02:10 PM IST
शाहरूख-कजोलच्या जोडीला रिप्लेस करणार आराध्या-अबराम title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींपेक्षा स्टारकिड्सच्या चर्चा तुफान रंगत असतात. आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक नव्या कलाकारांनी कलाविश्वात पदार्पण केले आहे. आता चर्चा रंगत अभिनेता शाहरूख खानचा मुलगा अबराम आणि ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी आराध्या बच्चन यांच्या ऑनस्क्रिन जोडीविषयी. नुकताच झालेल्या एका चॉट शोमध्ये शाहरूखला तुझी आणि काजोलची जोडी रिप्लेस करायची असेल तर तू कोणासोबत करशील? असा प्रश्न विचारण्यात आला होता. 

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्याला रणबीर कपूर- दीपिका पदुकोण, रणवीर सिंग- दीपिका पदुकोण, आलिया भट्ट-सिद्धार्थ मल्होत्रा, फवाद खान- सोनम अशा जोड्यांचे पर्याय देखील दिले. परंतू त्याने अबराम आणि ऐश्वर्या-अभिषेकची मुलगी आराध्याचे नाव घेतले. 

तेव्हा अबराम आराध्यापेक्षा लहान आहे... असं  काजोल म्हणाली. त्यावर 'प्रेमाला वयाचं बंधन नसतं' असं उत्तर शाहरूख दिलं. त्यानंतर एका मुलाखतीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना एका मुलाखतीत याबाबतीत प्रश्न विचारण्यात आला होता. 

या प्रश्नाचे उत्तर देताना बिग बी आनंदाने  म्हणाले, 'मी त्या दिवसाची वाट पाहेल...' बिग बींच्या या प्रतिक्रिये नंतर चाहत्यांच्या मनात देखील आराध्या आणि अबरामला ऑनस्क्रिन भूमिका साकारताना  पाहाण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.