मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा अबराम हा 27 मे रोजी 5 वर्षाचा झाला. याचं औचित्य साधून शाहरूख खानने आपल्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला शाहरूख खानच्या चाहत्यांनी खूप पसंत केलं असून आणि अबराम याचा देखील स्टार किड्समध्ये पहिला नंबर लागतो. अबरामचे देखील खूप फॅन फॉलोअिंग आहेत.
शाहरूख खानचं म्हणणं आहे की प्रत्येक मुलाने आपला स्वतःचा आवाज ऐकला पाहिजे. मुलांनी आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. शाहरूखची 3 मुले आहेत. आर्यन, सुहाना आणि अबराम. अबराम रविवारी पाच वर्षाचा झाला. यावेळी शाहरूख खानने आपल्या अबरामचा फोटो शेअर करताना 'सनशाइन' अशी कमेंट केली आहे.
My sunshine turns 5 yrs today but he thinks he is 9! Please don’t tell him otherwise if u meet him. Children should hear their own music, sing their own songs & believe in their own lil dreams...& yeah, hug their papa a lot.. pic.twitter.com/sRFxJLdVHh
— Shah Rukh Khan (@iamsrk) May 27, 2018
शाहरूख खानने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, माझा सनशाइन हा 5 वर्षांचा झाला आहे. मात्र तो विचार करतो की तो 9 वर्षांचा आहे. जर तुम्ही त्याला भेटलात तर कृपा करून सांगू नका. लहान मुलांना आपल्या स्वतःची आवाज ऐकायची असते. तुम्ही त्यांच्याशी बोलायला पाहिजे. त्यांच्या छोट्या छोट्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला पाहिजे. आपल्या वडिलांना एकसारखं मिठीत घेतलं पाहिजे.