मुलगा तुरुंगात गेल्यानंतर व्हायरल होतोय शाहरुख खानचा भावूक व्हिडिओ

आर्यनच्या जामीन अर्जाच्या सुनावणी पूर्वी व्हायरल होतोय शाहरुखचा भावूक व्हिडिओ 

Updated: Oct 14, 2021, 07:54 AM IST
मुलगा तुरुंगात गेल्यानंतर व्हायरल होतोय शाहरुख खानचा भावूक व्हिडिओ

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. ड्रग्स केस प्रकरणी शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात असल्यामुळे शाहरुख वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गुरूवारी पुन्हा आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावर आर्यनचं भवितव्य ठरणार आहे. दरम्यान शाहरुखचा एक भावूक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

आता बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या शाहरुखने त्याच्या करियरची सुरूवात दूरदर्शनच्या मालिकांच्या माध्यमातून केली. त्याने 'सर्कस', 'दिल दरिया', 'फौजी' आणि 'दूसरा केवल' या मालिकांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. पण 'दुसरा केवल' मलिकेतील त्याच्या भूमिकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. 

पंजाबच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या या मालिकेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात शाहरुख खान टायटल सॉन्ग गाताना दिसत आहे. 'दुसरा केवल' या मालिकेत शाहरुख खानची हत्या होते आणि विनिता मलिक यांनी त्याच्या आईची भूमिका केली. फक्त हत्येच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या मालिकेने चाहत्यांना भावूक केलं. 

आर्यनच्या जामीन अर्जावर गुरूवारी होणार सुनावणी 
आर्यनच्या बेल वर आज सुनावणी होणार आहे. आज 12 वाजता सुनावणी होणार असून एनसीबीचे वकील युक्तीवाद सुरु ठेवतील. आज 5 वाजे पर्यंत जर निर्णय आला नाही तर पुढील 5 दिवस कोर्ट बंद आहे.