मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खान याची मुलगी सुहाना खान कोणत्या चित्रपटाच्या मध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणार याच्या चर्चा नेहमीच रंगलेल्या असतात. सोशल मीडियाव रदेखील कायम सक्रीय असणाऱ्या सुहानाचे रंगमंचावरील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहे. शाहरूखने तिच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल अनेक मुलाखतींमध्ये आपले मत मांडले होते. 'ती अद्याप बॉलिवूडमध्ये काम करणार नाही, तिला बरचं काही शिकायचं आहे.' असे त्याने म्हंटले होते. परंतू तिचा चित्रपटातील फर्स्ट लूक सध्या व्हायरल होत आहेत.
रिपोर्टनुसार, सुहाना एका लघुचित्रपटात अभिनय करण्यास सज्ज झाली आहे. 'द ग्रे पार्ट ऑफ ब्ल्यू' लघूचित्रपटात ती झळकणार आहे. Theodone Gimeno चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुहानाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे.
गतवर्षी सुहानाने तिच्या वडिलांच्या 'झिरो' या चित्रपटासाठी असिस्टंट म्हणून काम पाहिले होते. त्याचप्रमाणे रंगमंचावरील तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. शाहरूखच्या मुलीला अभिनयात आपली छाप पाडायची आहे.