Raj Kundra Case : खर्चाच्या मुद्यावरून ट्रोल झाल्यानंतर शमिता शेट्टीचा खुलासा

शमिता शेट्टीचा सर्व खर्च करते शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा? 

Updated: Aug 4, 2021, 02:03 PM IST
Raj Kundra Case : खर्चाच्या मुद्यावरून ट्रोल झाल्यानंतर शमिता शेट्टीचा खुलासा

मुंबई :  पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यानंतर शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा मोठ्या अडणीत सापडला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा शिट्टीची बहिण शमिता शेट्टी चर्चेत आली आहे. एवढंच नाही तर तिला आता ट्रोल देखील केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी शमिता शेट्टी पर्लरमध्ये जाताना दिसली तेव्हा देखील ट्रोल करण्यात आलं आणि तुझा सर्व खर्च शिल्पा आणि राज करतात का? असा प्रश्न देखील शमिताला विचारण्यात आला. यावर शमिताने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

शमिता म्हणाली, 'मी याठिकाणी स्पष्ट करते.  मी स्वतःचा खर्च करते. शिल्पा माझी मोठी बहिण असल्यामुळे मला तिच्यासारखं राहायला आवडतं. माझी तिच्यासोबत तुलना होत असल्यामुळे मला काही वाटत नाही.' असं शमिता म्हणाली. त्याचप्रमाणे दोन व्यक्तींना समान गोष्टी मिळू शकत नाहीत, तर सगळे असा अंदाज का व्यक्त करतात. 

शमिताच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, राज कुद्राला अटक झाल्यानंतर शमिता सतत चर्चेत आहे. 19 जुलै रोजी पोर्नोग्राफी प्रकरणात राजला अटक करण्यात आली. सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे. 

शमिताने अभिनेता शाहरूख खान स्टारर 'मोहबत्ते' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटासाठी तिला 'स्टार डेब्यू ऑफ द ईयर' पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. शमिताला 'मेरे यार की शादी हैं' चित्रपटातील 'शरारा शरारा' गाण्याच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळाली.