शनाया कपूरचा ग्लॅमरस व्हिडिओ; बिग बींची नात म्हणते, 'कोणी केला शूट?'

त्या ग्लॅमरस व्हिडिओमुळे कपूर कुटुंबातील मुलगी चर्चेत?

Updated: Jul 31, 2021, 10:20 AM IST
शनाया कपूरचा ग्लॅमरस व्हिडिओ; बिग बींची नात म्हणते, 'कोणी केला शूट?'

मुंबई : अभिनेत्री शनाया कपूर अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तुफान चर्चेत असते. अभिनेत्री संजय कपूरची शनाया कपूर लवकरचं  बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक करण जोहरने शनायाला बॉलिवूडमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. तिने आता सोशल मीडिया अकाऊंट  देखील पब्लिक केलं आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सध्या शनायाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शनाया सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते.  ती आयुष्यातील महत्त्वाचे क्षण सोशल मीडिया शेअर करत असते. आता जो व्हिडिओ शनायाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. शिवाय व्हिडिओमध्ये तिने वेग-वेगळ्या अंदाजात पोज देखील दिल्या आहेत. 

तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेन्टचा वर्षाव केला आहे. अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खानने बदामाचा इमोजी कमेन्टमध्ये पाठवला आहे. तर महानायक अमिताभ बच्चन यांची नातं नव्या नवेलीने 'व्हिडिओ शूट कोणी केला?' असा प्रश्न विचारला आहे.