मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांची लव्हस्टोरी खूप प्रसिद्ध होती. यातील एक कारण म्हणजे त्यांनी शर्मिला यांना केलेलं अनोख्या पद्धतीचं प्रपोज या मागच कारण मानलं जातं. नवाब पटौदी यांनी शर्मिला टागोर यांना प्रपोज करण्यासाठी 7 फ्रिज भेट म्हणून पाठवले होते. एवढेच नव्हे तर त्यानी 4 वेळा गुलाबही त्यांना पाठवली होती.
रवींद्रनाथ टागोर यांच्याशी शर्मिला टागोर यांचा संबंध
शर्मिला टागोर यांचा जन्म 8 डिसेंबरला हैदराबाद येथे गितींद्रनाथ टागोर यांच्या घरी झाला. शर्मिला टागोर यांचे वडील बंगाली होते, तर आई आसाममधील होती. हे दोघे नोबेल पुरस्कार विजेते रवींद्र टागोर यांचे दूरचे नातेवाईक होते. शर्मिला टागोर श्रीमंत आणि संपन्न घरात वाढल्या होत्या. शर्मिला टागोर यांनी 1959मध्ये 'अपूरा संसार' या बंगाली चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.
सत्यजित रे यांनी दिली शर्मिला यांना संधी
शर्मिला टागोर यांनी सत्यजित रे यांच्या चित्रपटापासून सुरुवात केली होती. आणि रिषीकेश मुखर्जी यांच्या सिनेमांमधून तिला अभिनयाची चांगली पसंती मिळू लागली होती. 1969पर्यंत शर्मिला टागोर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करून एक प्रसिद्ध अभिनेत्री बनल्या होत्या. याच दरम्यान, त्यांची भारतीय संघाचे प्रसिद्ध कर्णधार आणि पतौडीचे नवाब मन्सूर अली खान यांच्यासोबत भेट झाली.
नवाब पटौदी आणि शर्मिला यांचं प्रेम
शर्मिला यांना महागड्या भेटवस्तू देवुन त्यांचं मनं जिकंणं इतकं सोपं नव्हतं, तर दुसरीकडे मन्सूर सुद्धा हार मानणाऱ्यातले नव्हते. त्यांनी शर्मिलाला 4 वेळा गुलाब पाठवून प्रपोज केलं. शर्मिला टागोर यांनी नवाब पटौदी यांचं प्रपोज मान्य केलं. वेग-वेगळ्या धर्मामुळे त्यांच्या प्रेमात अनेक अडथळे आले
शर्मिला टागोर तीन मुलांची आई
शर्मिला टागोर यांनी 27 डिसेंबर 1959 रोजी नवाब पटौदीसोबत लग्न केले. शर्मिलाने लग्नासाठी आपलं नाव आयशा सुल्ताना ठेवलं होतं. शर्मिला आणि नवाब पटौदी यांनाही सैफ अली खान, सबा अलीखान आणि सोहा अलीखान अशी 3 मुले आहेत. शर्मिला टागोर यांना 1975 आणि 2003 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2013मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.