Viral Video : एअरपोर्टवर स्टार कपलकडून बेडरुममध्ये करण्याजोगं काम

Viral Video : चर्चा काही थांबता थांबेना

Updated: Dec 29, 2021, 05:16 PM IST
Viral Video : एअरपोर्टवर स्टार कपलकडून बेडरुममध्ये करण्याजोगं काम title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) सहसा सेलिब्रिटींची ये-जा सुरु असते. अनेकदा सेलिब्रिटींची एक झलक टीपण्यासाठी म्हणून छायाचित्रकारांची इथं प्रचंड गर्दी पाहायला मिळते. याच छायाचित्रकारांनी नुकतंच एका सेलिब्रिटी जोडीला अशा अवस्थेच कॅमेरात टीपलं, की याची चर्चा काही थांबता थांबेना. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही सेलिब्रिटी जोडी जे काम करतेय ते पाहिल्यानंतर नेटकरीही प्रचंड भडकले आहेत. 

कोण होती ती जोडी?
सध्या चर्चेत असणारी ती जोडी आहे, अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) आणि तिचा पती, अभिनेता पराग त्यागी (Parag Tyagi). 

पराग शेफालीला सोडण्यासाठी म्हणून विमानतळावर आला होता. पण, आता पत्नी दूर चालली म्हटल्यावर हा काही काळाचा विरहही त्याला सहन होईना.

किमान त्याची कृती पाहून तरी असंच वाटत होतं. 

कारण, शेफाली निघण्यापूर्वी परागनं तिला किस केलं. ते दोघं एकसारखं एकमेकांना किस करु लागले. बस्स, मग काय? हा व्हिडीओ व्हायरल झाला. 

घरातील बंद खोलीत करायची कामं हे असेच उघड्यावर का करत आहेत, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी देत या व्हिडीओवर संताप व्यक्त केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

एका गाण्यामुळं शेफाली प्रसिद्धीझोतात... 
शेफाली (Shefali Jariwala) ही एका गाण्यामुळं कमालीची प्रसिद्धीझोतात आली होती. 2002 मध्ये आलेल्या 'काँटा लगा' या गाण्यानं तिला रातोरात लोकप्रिय केलं होतं. 

गाण्यामुळं मिळालेल्या प्रसिद्धीनंतर शेफाली एकाएकी कलाविश्वापासून दूर राहिली. 

मिरगीच्या झटक्यांमुळं तिला 15 वर्षांचा काळ बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. पण, त्यानंतर तिनं या आजारावरही मात केली होती.