अंडे का फंडा, गायकाला तीन अंड्यांसाठी मोजावे लागले हजारो रूपये

तीन उकडलेल्या अंड्यांचं बिल त्याने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलं आहे.

Updated: Nov 15, 2019, 04:21 PM IST
अंडे का फंडा, गायकाला तीन अंड्यांसाठी मोजावे लागले हजारो रूपये

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता राहूल बोसला दोन केळ्यांसाठी तब्बल ४४२ रूपये मोजावे लागले होते. चंदीगडच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये हा प्रकार घडला होता. तशीच घटना प्रसिद्ध गायक आणि म्यूझीक दिग्दर्शक शेखर रविजानीसोबत घडला आहे. हयात रीजेंसी हॉटेलमध्ये त्याच्याकडून तीन उकडलेल्या अंड्यांसाठी १ हजार ६७२ रूपये आकारण्यात आले. 

तीन उकडलेल्या अंड्यांचं बिल त्याने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलं आहे. १ हजार ६७२ रूपयांचं बिल पोस्ट करत त्यानं कॅप्शनमध्ये '३ अंड्यांसाठी १६७२ रूपये? भोजन जरा जास्तच झालं.' असं लिहिलं आहे. 

शेखरच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी मात्र त्याची चांगलीच खिल्ली उडवली. 'उकडलेलं अंड बाहेर १० रूपयात मिळतं सर, बाहेर खायला हवं होतं.', तर दुसऱ्या युजरने 'मेन्यू कार्ड बघून ऑर्डर नाही का केलं?' अशा प्रकारे नेटकरी इन्टरनेटवर शेखरची खिल्ली उडवत आहेत. 

विशाल ददलानी आणि शेखर रविजानी या जोडीनं बॉलिवूड सिनेसृष्टीला अनेक प्रसिद्ध गाणी दिले आहेत. संगीत विश्वात त्यांना विशाल-शेखर या नावाने ओळखले जाते.