Sherlyn Chopra चा Shilpa Shetty वर हल्लाबोल; म्हणाली 'चुकी मान्य कर दीदी'

शिल्पा शेट्टीला कोणती चूक मान्य करायला लावतेय शर्लिन चोप्रा? 

Updated: Aug 30, 2021, 09:16 AM IST
Sherlyn Chopra चा Shilpa Shetty वर हल्लाबोल; म्हणाली 'चुकी मान्य कर दीदी' title=

मुंबई : अभिनेता शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा सध्या तुरूंगात आहे. पतीच्या अटकेनंतर शिल्पा सोशल मीडियापासून दूर होती. पण आता ती पुन्हा नॉर्मल जीवन जग जगत आहे. आता तिने शुटिंगला देखील सुरूवात केली आहे. नुकताचं 'सुपर डान्सर' रिऍलिटी शो शिल्पाने पदार्पण केलं. दरम्यान शर्लिन चोप्राने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये शर्लिनने शिल्पावर निशाणा साधला आहे. या व्हिडिओध्ये तिने शिल्पाला चूक मान्य करण्याची विनंती केली आहे. 

'हाय शिल्पा दीदी... नुकताचं एका रिऍलिटी शोच्या मंचावर तु म्हणालीस की, राणी लक्ष्मीबाई यांच्या गोष्टी ऐकते तुला गर्व वाटतो. त्यांनी न्यायासाठी संघर्ष केला. पण  आता ज्या मुली न्यायासाठी वेग-वेगळ्या पोलीस स्थानकात जावून जबाब नोंदवत आहेत. त्यांचं काय?' असा प्रश्न शर्लिन चोप्राने व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओ शेअर करत शर्लिनने कॅप्शनमध्ये, 'शिल्पा माझी तुझ्याकडे एक विनंती आहे की, तु पीडित मुलींबद्दल थोडी सहानुभूती दाखव... स्वतःच्या चुकीचा स्वीकार कर... असं केल्याने कोणी छोट होणार नाही...' अलं लिहिलं आहे. सध्या शर्लिनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.