'या' व्यक्तीसाठी शेवंताने केला खास नऊवारी लूक आणि एवढा नट्टापट्टा

पण शेवंताने एवढा नट्टापट्टा नक्की कोणासाठी केलाय?, नेटकऱ्यांचा शेवंताला सवाल

Updated: Jun 23, 2021, 04:07 PM IST
'या' व्यक्तीसाठी शेवंताने केला खास नऊवारी लूक आणि एवढा नट्टापट्टा

मुंबई :  अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर म्हणजेच अण्णा नाईकांची लाडकी शेवंता.. जिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर अण्णा नाईकांसह लाखो रसिक प्रेक्षक फिदा आहेत.. शेवंता म्हणून स्मॉल स्क्रिनवर एन्ट्री केल्यापासूनच अपूर्वाच्या फॅन फॉलोविंगमध्ये वेगाने वाढ झाली. सोशल मीडियावर देखील आता शेवंताचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला.. घराघरात तिची ओळख झाली..पण सध्या शेवंता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीये.

नुकतेच शेवंताने नव्वारी लूकमधील काही फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत..  पिवळ्या रंगाच्या साडीतील शेवंताच्या या लूकची सध्या चांगलीच हवा पाहायला मिळतेय.पण शेवंताने एवढा नटा-पटा नक्की कोणासाठी केला आहे, असा प्रश्न ही नेटकऱ्यांनी तिला विचारायला सुरुवात केलीये.. त्यात हे फोटो लग्न समारंभातील असल्याने शेवंता लग्न करतेय की काय अशी ही चर्चा सुरु झालीये..

पण हा मराठमोळा साजश्रृंगार शेवंताने खास भावाच्या लग्नासाठी केला होता.. त्याचेच हे फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केलेत.. या फोटोला True Maharashtrian is always in Nauwariअसं तिने कॅप्शन दिलंय.. अपूर्वाचे स्वत:चं ज्वेलरी कलेक्शन आहे. त्यामुळे या  नव्वारी साडीवर शोभून दिसतील असे आपल्या ब्रॅण्डचे डिझाईनर दागिने ही तिने यावेळी परिधान केले होते..

अपूर्वा सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही नवं घेऊन येत असते.. तिच्या प्रत्येक पोस्टची चर्चा रंगताना दिसते.. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या नव्या पर्वात अण्णा नाईक परत येणार म्हटल्यावर शेवंता ही परत येणार ना असा एकच प्रश्न शेवंताच्या चाहत्यांनी विचारला होता. त्यानंतर शेवंताने सेटवरील फोटो शेअर करत  कमबॅकची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.