राजच्या पॉर्न फिल्म प्रकरणाचा शिल्पा शेट्टीला असा फटका!

राज कुंद्राच्या अटकेचा फटका हा कुठेतरी शिल्पा शेट्टीला बसल्याची शक्यता आहे.

Updated: Jul 22, 2021, 08:15 AM IST
राजच्या पॉर्न फिल्म प्रकरणाचा शिल्पा शेट्टीला असा फटका!

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा राज कुंद्रा याला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर पती राज कुंद्राच्या अटकेचा फटका हा कुठेतरी शिल्पा शेट्टीला बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मिळालेल्या माहितीनुसार, राजच्या अटकेनंतर 'सुपर डांसर चॅप्टर 4'चं शूटींग शिल्पाने मध्येचं सोडून दिलं आहे.

रिपोर्ट्सनुसार, शिल्पाने पती राजच्या अटकेनंतर 'सुपर डांसर चॅप्टर 4'चं शूटींग करणं सोडून दिलं आहे. दरम्यान आता शोच्या अपकमिंग एपिसोड्समध्ये शिल्पा शेट्टीच्या ऐवजी अभिनेत्री करिश्मा कपूर दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

या विकेंडला 'सुपर डांसर चॅप्टर 4'मध्ये गेस्ट म्हणून करिश्मा कपूर येणार आहे. करिश्मा कपूर सेटवर आली असता सगळ्या कंटेस्ट्सने सुपर गुरुंसोबत करिश्माला ट्रिब्यूट दिला आहे. त्यामुळे आता शोमध्ये अभिनेत्री करिश्मा कपूरला शिल्पा शेट्टीच्या जागी रिप्लेस करणार का असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

सोमवारी मुंबई क्राईम ब्रांचने राज कुंद्राला अटक केली होती. पॉर्न फिल्म तयार करणं आणि ते अपलोड करण्याच्या आरोपांवरून राजला अटक करण्यात आली आहे. दरम्यान राजच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र या प्रकरणानंतर शिल्पाने सुपर डान्सरचं शूट कॅन्सल केलं असून अपकमिंग फिल्म हंगामा 2चं प्रमोशन देखील रोखल्याची माहिती आहे. 

'सुपर डान्सर चॅप्टर 4' हा डान्स रिअॅलिटीमध्ये शिल्पा जजच्या भूमिकेत आहे. शिल्पासोबत दिग्दर्शक अनुराग बासू आणि नृत्यदिग्दर्शक गीता कपूर हे आहेत.