शिल्पाही झाली दीपिकाच्या सौंदर्यावर घायाळ

 शिल्पा शेट्टी आणि दीपिका पदुकोण या दोघींचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 17, 2017, 10:22 PM IST
शिल्पाही झाली दीपिकाच्या सौंदर्यावर घायाळ title=

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची फिल्म 'पद्मावती' लवकरच रिलीज होणार आहे. सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकतीच ती सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'सुपर डान्सर्स' च्या सेटवर गेली होती. यावेळी क्रिम कलरच्या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. 

व्हिडिओ व्हायरल

या सेटवरचे शिल्पा शेट्टी आणि दीपिका पदुकोण या दोघींचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये शिल्पा दीपिकाची तोंडभरुन कौतुक केले. 

दीपिका 'राणी' सारखीच 

दीपिका जशी सिनेमामध्ये दिसते तशी ऑफस्क्रिनही राणी सारखीच दिसत आहे असे शिल्पा या व्हिडिओत सांगताना दिसत आहे.

शिल्पाने कले आवाहन 

या सिनेमाची मी आतूरतेने वाट बघत असून दर्शकांनीही हा सिनेमा नक्की पाहावा असे सांगत माझा नवरा राज हा एपिसोड नक्की बघत असेल असे शिल्पा म्हणत आहे.

 

बिग बॉसच्या घरात जाणार 

या सिनेमात रणबीर सिंग आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहेत. पण आतापर्यंत ते कोणत्याच प्रमोशनमध्ये दिसले नाहीत. लवकरच शाहिद आणि दीपिका या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या घरात जाणार आहेत. हा सिनेमा १ डिसेंबर रोजी रिलीज केला जाणार होता परंतु ही तारीख १२ जानेवारी पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.