राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीचा पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडिओच्या माध्यमातून शिल्पाने दिला महत्त्वाचा सल्ला

Updated: Aug 16, 2021, 02:07 PM IST
राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीचा पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  title=

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात पतीचं नाव समोर आल्यामुळे शिल्पा सोशल मीडियापासून दूर होती. शिवाय 'सुपर डान्सर चॅप्टर 4' शोचं परीक्षण करताना देखील शिल्पा सध्या दिसत नाही. पण अखेर शिल्पा सोशल मीडियावर पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. नुकताचं शिल्पाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती नकारात्मकता दूर कशी करावी याबद्दल सांगत आहे. शिल्पाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

shilpa

शिल्पा नेगेटिव्हीटी दूर करण्यासाठी योगा करत असल्याचं दिसत आहे. शिवाय तिने चाहत्यांना देखील योगा करण्याचा सल्ला दिला आहे. शिल्पाने व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली की, 'सकारात्मक राहण्यासाठी आताच्या घडीला प्राणायम अत्यंत गरजेचं आहे.' शिल्पाचा हा व्हिडिओ सध्या तुफान चर्चेत आहे.

दरम्यान शिल्पाने सोशल मीडियावर 15 ऑगस्ट रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी शिल्पाला स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या, तर अनेकांनी तिला ट्रोल केलं.