मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच योग सधानेचे महत्व सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते. योगाचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. पण योगा कसा करावा, योगा करण्याचे प्रकार, त्यातील शास्त्र इत्यादी गोष्टी पहिल्याच वेळी योगा करताना समोर उभे राहतात. अशा सर्व प्रश्नांचे निराकरण शिल्पाने केले आहे. शिल्पाने चाहत्यांसाठी शिल्पा शेट्टी नावाचा खास योगा करण्याकरता अॅप लॉन्च केला आहे.
'शिल्पा शेट्टी' नावाचा अॅप प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात समोर येणाऱ्या समस्या, वाढता ताणव, थकवा, नैराश्य त्याचप्रमाणे बदलती जीवनशैलीचा परिणाम नकळत आपल्या आरोग्यावर होत असतो.
नियमित योगा केल्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत तर होतेच, पण शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील एकत्व अनुभवण्याची पद्धत म्हणजे योग. शास्त्रांमध्ये सुद्धा योगसाधना आरोग्यास फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगाविद्या आणि योगसाधनेचे महत्व पटवून देत, २०१४ साली झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि संयुक्त राष्ट्रांनी या प्रस्तावास मान्यता दिली. तेव्हापासूनच जगभरात २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.