सैफला सोडून 'या' अभिनेत्यासोबत करीना थाटणार संसार? स्वत: अभिनेत्रीकडून वक्तव्य

"मला कधीकधी वाटते की, मी सैफ अली खान सोडून..." करीनाचं वक्तव्य

Updated: Nov 30, 2021, 04:47 PM IST
सैफला सोडून 'या' अभिनेत्यासोबत करीना थाटणार संसार? स्वत: अभिनेत्रीकडून वक्तव्य

मुंबई : बॉलीवूडची बेबो म्हणून ओळखली जाणारी करीना कपूर आज तिच्या चित्रपटांद्वारे आणि मेहनतीने प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. करीना कपूर केवळ तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरने एक विचित्र गोष्ट सांगितली होती. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत करीना म्हणाली होती की, "मला कधीकधी वाटते की, मी सैफ अली खान सोडून अर्जुन कपूरसोबत लग्न करावं."

करीनाची ही बातमी सध्या सोशल मीडियावरती जोर धरत आहेत. कारण अर्जुन कपूरचं नुकतंच मलाईकासोबत वाजलं असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे लोकांना आता असं वाटत आहे की, यामुळेच मलायका आणि अर्जुनचे भांडण तर झालं नसावं ना?

परंतु लक्षात घ्या की, दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही एक संबंध नाही. करीनाची ही मुलाखत फार पूर्वीची आहे.

खरंतर काही काळापूर्वी करीना कपूर आणि अर्जुन कपूरचा 'की अँड का' नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटात करीना कपूर आणि अर्जुन कपूर जोडपे म्हणून दाखवण्यात आले होते आणि ते पती-पत्नीच्या भूमिकेत होते. अर्जुन कपूर घरातील सर्व कामे करतो आणि करीना कपूर एक वर्किंग वुमन असल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले होते.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करीना आणि अर्जुन अनेक माध्यमांच्या संपर्कात आले. अशाच एका माध्यमाला मुलाखत देताना करीनाने हे सांगितले होते.

असे करीनाने का म्हटलं?

करीना कपूर आणि अर्जुन कपूर त्यांच्या 'की अँड का' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक मीडिया चॅनलला मुलाखती देत होते. तेव्हा करीनाला तिच्या ऑनस्क्रीन पती आणि ऑफस्क्रीन पतीबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते.

यावर प्रतिक्रिया देताना करीना कपूर म्हणाली होती की, कधीकधी मला वाटते की, मी सैफला सोडून अर्जुनसोबत लग्न करावे. खरे तर तिने हे गंमतीने सांगितले होते. अर्जुन कपूरच्या अभिनयाचे कौतुक करताना करीना कपूर असे सांगत होती.

किसिंग सीनवरून सैफ आणि करिना यांच्यात मतभेद नाहीत

या मुलाखतीत करिनाला इतर अनेक वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आले होते. पत्रकाराने करीनाला विचारले की, लग्नानंतर पतीसोबतच्या कोणत्याही किसिंग सीनबाबत तिने काही धोरण आखले आहे का? यावर प्रतिक्रिया देताना करीनाने सांगितले होते की, आमच्या दोघांमध्ये असे कोणतेही धोरण बनलेले नाही. जेव्हा चित्रपटात आवश्यक असेल तेव्हा किसिंग सिन द्यावे लागतात. सैफनेही अनेकवेळा किसिंग सीन दिले आहेत आणि करिनानेही या चित्रपटात पती-पत्नीची भूमिका केल्यामुळे अर्जुन कपूरसोबत किसिंग सीन दिले आहेत.