इटलीला जाण्याअगोदर बॉलिवूडच्या बाजीरावचा राग अनावर

पाहा हा व्हिडिओ

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 10, 2018, 07:43 PM IST
इटलीला जाण्याअगोदर बॉलिवूडच्या बाजीरावचा राग अनावर

मुंबई : बॉलिवूडची हिट जोडी दीपवीर म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाचं काऊंट डाऊन सुरू झालं आहे. या दोघांच 14 आणि 15 नोव्हेंबरला लग्न होणार आहे. हे दोघंजण लग्नासाठी इटलीला रवाना झाले आहेत. पण लग्नाला जाण्यापूर्वीदेखील रणवीरला आपला राग आवरता आला नाही. तर जाणून घेऊया बॉलिवूडच्या बाजीरावचं डोकं का झालं गरम... 

Add Zee News as a Preferred Source

दीपिका - रणवीर यांच्या लग्नावरून जोरदार चर्चा रंगली आहे. तर या कपलला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सगळ्यांचीच गडबड सुरू आहे. रणवीर एअरपोर्टला आपल्या कारने जात असताना मीडियाने त्याला घेरलं आणि याचवेळी फोटोग्राफर्स त्याच्या कारवर चढल्यामुळे रणवीरला राग अनावर झाला. त्याने सर्वात अगोदर गाडीपासून दूर होण्यासाठी सांगितलं. 

या दोघांनी इटलीला जाण्याअगोदर कपड्यांचा रंग देखील निवडला. दीपवीरने शुभ्र सफेद रंगाचे कपडे घालण पसंत केलं. एअरपोर्टपर्यंत रणवीर स्वतः ड्राइवकरून गाडी घेऊन आला त्याच्यासोबत यावेळी दीपिका देखील होती.

About the Author

दक्षता ठसाळे-घोसाळकर

"दक्षता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन, बॉलीवूड, सोशल स्टोरीज, लाइफस्टाइल आणि लिस्टिकल स्टोरीज अशा विविध विषयांचे कव्हरेज केले आहेत. सध्या, दक्षता लाईफस्टाईल या सेक्शनमध्ये जीवनशैली, सामान्य कथा आणि आरोग्य विभाग हाताळत आहे. गेल्या 22 महिन्यांपासून दक्षता या विभागात काम करत आहे. तिच्या मोकळ्या वेळेत, तिला ब्लॉग लिहिणे, पुस्तके वाचणे आणि चित्रपट पाहणे आवडते. तिची निपुणता आणि मीडियाबद्दलची आवड तिला कोणत्याही संस्थेसाठी मनापासून काम करण्यास मदत करते."

...Read More