15 वर्षाच्या मुलाचा सुष्मिता सेनला घाणेरडा स्पर्श

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार हे पब्लिक प्लेसमध्ये कायम आपल्याला बॉडीगार्ड्समध्ये असतात. मात्र याचा अर्थ असा नाही की, ते अगदी सुरक्षित असतात. झालं असं की, बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेन हिला अतिशय वाईट अनुभव आला आहे. मिस युनिव्हर्स राहिलेली अभिनेत्री सुष्मिता सेनने आपल्यासोबत घडलेला विचित्र प्रकार एका कार्यक्रमात सांगितला आहे. एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या सुष्मिता सेनसोबत 15 वर्षाच्या मुलाने चक्क गैरवर्तणूक केली आहे. 

काय म्हणाली सुष्मिता?

सुष्मिता सेनने या घटनेला आठवून  सांगितलं की, अनेकदा लोकांना वाटतं की आम्ही बॉडीगार्डमध्ये असतो म्हणजे आम्ही सुरक्षित आहोत. आम्हाला कोणत्याच वाईट गोष्टींचा सामना करावा नाही लागला. पण असं नाही आम्ही तर गर्दीत असतो आम्हाला एकाच वेळी 100 लोकांच्या वाईट नजरांना सामोरे जावे लागते. 

कुणी केला घाणेरडा स्पर्श ?

6 महिन्यापूर्वी झालेली एक घटना. मी एका अवॉर्ड शोमध्ये गेले होते. तेव्हा एकाने मला पाठून हात लावला तेव्हा मी अगदी अलर्ट राहून त्या व्यक्तीचा हात पकडला आणि त्याला समोर आणलं. त्या व्यक्तीला पाहून सुरूवातीला मला धक्काच बसला. कारण ही व्यक्ती म्हणजे एक 15 वर्षाचा मुलगा होता. सुष्मिताने पुढे सांगितलं की, मी त्याची मान पकडून आणि त्यालासोबत घेऊन चालू लागली. त्याला न ओरडता मी त्याला त्याची चूक मान्य करायला लावली. सुरूवातीला तो ती गोष्ट मान्य करायला तयार नव्हता. मात्र नंतर माफी मागत त्याने गोष्ट मान्य केली.