... म्हणून वहीदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्या कानाखाली लगावली

स्वतः वहीदा रहमान यांनी सांगितला होता हा किस्सा 

Updated: May 17, 2021, 05:39 PM IST
... म्हणून वहीदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्या कानाखाली लगावली title=

मुंबई : अभिनेत्री वहीदा रहमान यांचा आज 83 वा वाढदिवस आहे. वहीदा रहमान यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात तेलुगु सिनेमापासून केली आहे. यानंतर त्यांनी हिंदी, तमिळ, मल्याळम आणि बंगाली सिनेमातही काम केलं आहे. मात्र हिंदी सिनेमापासून त्यांना भरपूर ओळख मिळाली. 

फिल्मी जगतात अनेकदा अशा काही गोष्टी घडतात ज्या कायमच स्मरणता राहतात. असंच काहीसं वहीदा रहमान यांच्यासोबत झालं आहे. काही दिवसांपूर्वी वहीदा रहमान या टीव्हीवरील कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये आल्या होत्या. तेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत शुटिंग करतानाचा एक किस्सा सांगितला. 

वहीदा रहमान यांनी 'रेश्मा और शेरा' या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळचा एक किस्सा सांगितला. ज्या सीनच्या वेळी त्यांनी बिग बी यांना चक्क कानाखाली मारली होती. अमिताभ यांना शुटिंगच्या अगोदर वहीदा रहमान यांनी सांगितलं की,'मी तुला अतिशय जोरात कानाखाली मारणार आहे.' आणि शुटिंगच्या वेळी त्यांनी खरोखरच जोरात कानाखाली मारली. 

अमिताभ यांच्या रिऍक्शनवरून सगळ्यांना अंदाज आला होता की, ही कानाखाली किती जोरात होती. शूट संपल्यावर अमिताभ बच्चन वहीदा रहमान यांच्या जवळ गेले आणि म्हटलं,'वहीदाजी खूप छान होतं.' पण आज आपल्याला माहित आहे अमिताभ बच्चन याच त्यांच्या खऱ्या अभिनयामुळे लोकप्रिय आहेत. गेले अनेक काळापासून बॉलिवूडचे शहनशाह सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत. आजही त्यांचा प्रत्येक अभिनय हा वेगळा असतो. 

वहीदा रहमान यांनी गुरू दत्त यांच्यासोबत अधिक काम केलं आहे. वहीदा या अतिशय सुंदर डान्सर देखील होत्या. त्यांनी आपल्या सुंदर नृत्याने आणि डान्सिंग स्किलने त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. वहीदा रहमान यांना दोनवेळा फिल्मफेअर पुरस्कार 'रेश्मा और शेरा' करता मिळालं आहे. तसेच नॅशनल अवॉर्ड आणि पद्मभूषण - पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे.