मुंबई : प्रसिद्ध सिने निर्माते सुजीत सरकार यांनी सोमावारी मीडियाला आणि त्याच्या फॅन्सना इरफान खानच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
सुजीत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफानची स्थिती आता ठीक आहे.
आता इरफानची स्थिती ठीक आहे. लवकरच त्याबाबत माहिती दिली जाईल. इरफान आणि त्याच्या कुटुंबाला आजारपणाची माहिती मिळताच धक्का बसला होता. इरफान खानला 'या' गंभीर कॅन्सरचा धोका ?
'पिकू' चित्रपटामध्ये सुजीत सरकारच्या दिग्दर्शनाखाली इरफान खानने काम केले आहे. इरफान हा असा एक बॉलिवूडचा स्टार आहे ज्याला हॉलिवूड स्टार म्हणून ओळखले जाते. इरफानने अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.
सुजीत आणि इरफान यांची तीन वेळेस भेट झाली आहे. इरफानची स्थिती आता ठीक आहे. इरफानच्या आजारपणाबाबत तर्क लावू नका अशी हात जोडून मागणी केली आहे.
अभिनेता इरफान खान अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपटांमधून रसिकांच्या भेटीला आला आहे. लवकरच इरफान खान 'ब्लॅकमेल' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनय देव यांनी केले आहे.