श्रद्धा कपूर बॉयफ्रेंडसोबत स्कूटीवर निघाली फिरायला

बॉयफ्रेंडसोबत श्रद्धाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.     

Updated: Jun 10, 2020, 12:41 PM IST
श्रद्धा कपूर बॉयफ्रेंडसोबत स्कूटीवर निघाली फिरायला  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ती लॉकडाऊननंतर आपल्या प्रियकरासोबत स्कूटीवर फिरत आहे. श्रद्धा तिच्या कथित बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठसोबत स्कूटीवर फिरत आनंद लुटताना दिसत आहे. यावेळेस श्रद्धा आणि रोहनने चेहऱ्याला मास्क लावला होता. परंतु ज्या क्षणी श्रद्धाने  पापाराझीला पाहिले तेव्हा तिने आपला चेहरा लपवला. श्रद्धाचा बॉयफ्रेंड प्रसिद्ध  सेलिब्रिटी फोटोग्राफर आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Shradha Kapoor & Rohan Shrestha spotted driving today on bike . Follow us for all full videos . . . #ShraddhaKapoor #TigerShroff #Tigershrofffans #lockdownindia #lockdown2020 #quarantine #quarantineindia #lockdown #bollywood #bollywoodnews #movies #bollywoodfans #filmstagram #bollywoodstylefile #filmstar #awards #moviestar #legends #moviescenes #filter #india_gram #indiancinema #instagood #instadaily #instalike #instashare #instamood #india #indian #bollywoodactor

A post shared by WHAT'S UP BOLLYWOOD (@whatsupbollywood) on

सांगायचं झालं तर, श्रद्धा, रोहन आणि भाऊ सिध्दांत कपूर हे तिघे एकत्र बाजारात सामान खरेदी करण्यासाठी गेले होते. यावेळेस रोहनने शॉर्ट्स आणि टी-शर्ट  घातलं होतं तर, श्रद्धा ब्लॅक टी-शर्ट आणि ट्रॅक पँटसह दिसली होती. श्रद्धा आणि रोहन बर्‍याच दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत.

आतापर्यंत त्याच्यात असलेल्या नात्यामुळे अनेक चर्चांना उधाणं आलं आहे. रोहन श्रेष्ठ टिन्सेल शहरातील प्रसिद्ध छायाचित्रकारांपैकी एक आहे. तर दुसरीकडे श्रद्धा बाघी ३ चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत झळकला होता.