श्रृती हसनकडून प्रेमाची कबुली, पण बॉयफ्रेंड काय म्हणाला, ते तर पाहा...

कलाविश्वात सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे नाही तर रिलेशनशिपमुळे तुफान चर्चेत असतात.  

Updated: Feb 24, 2022, 11:57 AM IST
श्रृती हसनकडून प्रेमाची कबुली, पण बॉयफ्रेंड काय म्हणाला, ते तर पाहा... title=

मुंबई : कलाविश्वात सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे नाही तर रिलेशनशिपमुळे तुफान चर्चेत असतात. सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे अभिनेत्री श्रृती हसनच्या नात्याबद्दल. श्रृती डूडल कलाकार सांतनू हजारिकाला डेट करत असल्याचंसमोर येत आहे. एवढंच नाही तर दोघे लग्न करणार असल्याचं समजत आहे. कारण रिलेशनशिपबद्दल सांतनूने मोठा खुलासा केला आहे. 

सांतनूने एका मुलाखतीत श्रृतीसोबत असलेल्या नात्याला दुजोरा दिला आहे. दोघे भावनात्मक रित्या जवळ आले आहेत. एकमेकांना प्रभावित करण्यासाठी त्यांच्याकडे कला, संगीताशिवाय अनेक गोष्टी आहेत. असं देखील संतनू म्हणाला.

'आम्ही दोघे कौशल्यपूर्ण आयुष्य जगत आहोत, आणि यामध्ये आम्ही आनंदी आहोत... एकमेकांना प्रेरणा देत आम्ही पुढचा प्रवास करत आहोत...' असं देखील संतनू म्हणाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

श्रृती आणि संतनू एकत्र राहतात. संतनू म्हणाला, 'आम्ही चांगले मित्र आहोत. एकत्र असल्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीवर आम्ही मात करू शकतो. आमचं नातं मैत्रीच्या आधारावर टिकलं आहे...'

श्रृतीने संतनूसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असते. त्यांच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव होत असतो.