ललित मोदी आणि सुष्मिताच्या नात्यावर वडिलांची पहिली प्रतिक्रिया

अभिनेत्रीच्या वडिलांच्या प्रतिक्रियेनंतर सर्वत्र खळबळ, काय म्हणाले सुष्मिताचे वडील?  

Updated: Jul 16, 2022, 10:15 AM IST
ललित मोदी आणि सुष्मिताच्या नात्यावर वडिलांची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आयपीएलचा माजी अध्यक्ष आणि उद्योगपती ललित मोदीला डेट करत असल्याच्या बातमीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबतचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच ललितने सुष्मिता सेनलाही बेटर हाफ असल्याचं देखील सांगितलं आहे. पण दोघांनी अद्याप लग्न केलं नसल्याचं समोर येत आहे. फक्त एकमेकांना डेट करत असल्याचंही ललित मोदीने ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सुष्मिताच्या ललित मोदीसोबत असलेल्या नात्याची चर्चा तुफान रंगत आहे. यावर सुष्मिताचे वडील शुबीर सेन (Shubeer Sen) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लेकीच्या नात्याबद्द त्यांनी कोणतीही माहिती नसल्याचं वडिलांनी सांगितलं आहे. 

मिस युनिव्हर्स होणार मिसेस मोदी? सुष्मिता सेनची आली पहिली प्रतिक्रिया

सुष्मिताचे वडिलांनी सांगितलं, 'मला याबाबत काहीच माहिती नाही. मी गुरुवारी सकाळी माझ्या मुलीशी बोललो, पण ती काहीच बोलली नाही. ट्विटरवर तुम्ही मला मेंशन केल्यानंतर मला कळाल. माहिती नसलेल्या प्रकरणाबद्दल काय बोलणार...'

शुबीर सेन पुढे म्हणाले, 'सुष्मिताकडून मी अद्याप ललित मोदीबद्दल काहीही ऐकल नाही. काही माहिती पडल्यानंतर तुम्हाला नक्की सांगेल. यामध्ये लपवण्यासारखं काहीही नीही..' असं देखील सुष्मितीचे वडील शुबीर सेन म्हणाले आहेत.