श्वेता तिवारीचा एक्स पती राजा चौधरीचा मोठा निर्णय, मुलीसाठी उचललं 'हे' पाऊल

श्वेता तिवारीचा एक्स पती राजा चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

Updated: Jul 28, 2021, 05:04 PM IST
श्वेता तिवारीचा एक्स पती राजा चौधरीचा मोठा निर्णय, मुलीसाठी उचललं 'हे' पाऊल

मुंबई : श्वेता तिवारीचा एक्स पती राजा चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका मुलाखतीत राज म्हणाला की, यावेळी त्याने आपली मुलगी पलकसोबत वाढदिवस साजरा केल्यामुळे त्याचा वाढदिवस  खूप खास साजरा झाला.

राज म्हणाला, ''पलक माझ्यासाठी केक घेऊन आली होती आणि आम्ही काही तास गप्पा मारल्या. वेळ कसा गेला मला कळालंच नाही. ती पहाटे घरी गेली. पलकला भेटल्यावर मला समजलं की, मी माझ्या मुलीच्या प्रेमासाठी मी किती उपाशी आहे. मला ती  माझ्या आयुष्यात हवी आहे. म्हणून मला एका रात्रीत वाटलं की आता मी मुंबईतच राहीन आणि पुन्हा माझ्या एक्टिंग करिअरवर लक्ष केंद्रित करीन. 

माझ्याकडे आधीच मुंबईत एक घर आहे. आता जगण्यासाठी मला पैसे कमवावे लागतील. मी माझ्या शरीरावर काम करण्यास सुरवात केली आहे आणि टीव्ही, चित्रपट आणि वेब मालिकेसाठी ऑडिशन देणं देखील सुरू केलं आहे. मी यावेळी कोणतीही भूमिका करीन, पैसे कमावणं किंवा प्रसिद्ध होणे हे माझं ध्येय नाही, मला फक्त मुंबईतच राहायचं आहे. जेणेकरुन मी माझी मुलगी पलकच्या जवळ राहू शकेन आणि तिच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवू शकेन.

मार्चच्या अगोदर राजने पलकची भेट घेतली होती. दोघंही 13 वर्षानंतर एकमेकांना भेटले. राजाने पलकच्या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता आणि लिहिलं की, मी पलकला 13 वर्षानंतर भेटलो. मी जेव्हा तिला शेवटचं पाहिलं तेव्हा ती खूप लहान होती आणि आता ती मोठी झाली आहे.  श्वेता तिवारीने तिचं पहिलं लग्न राज चौधरीसोबत केलं होतं. लग्नाच्या 9 वर्षानंतर दोघांच्या परस्पर संमतीने घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर श्वेताला मुलगी पलकचा ताबा मिळाला. यानंतर राज आणि पलक यांनाही भेटता आलं नाही. घटस्फोटानंतर श्वेताने अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं पण तेही टिकू शकलं नाही.