मुंबई : काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होती. या प्रकरणार भारतीय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने एक ट्विट केलं होतं. या ट्विटवर टीका करत साऊथ अभिनेता सिद्धार्थने अश्लिल टिप्पणी केली होती. यामुळे तो चांगलाच ट्रोल देखील झाला होता.
सोशल मीडियावर सिद्धार्थला चांगलच ट्रोल केल्यानंतर अभिनेता सिद्धार्थने स्पष्टीकरण जाहीर केलं आहे. तो म्हणतो की, त्याला कुणाचा अपमान करायचा नव्हता.
मंगळवारी अभिनेत्याने माफीनामा जारी केला आणि लिहिले, "प्रिय सायना, मी एका दिवसापूर्वी तुझ्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना लिहिलेल्या माझ्या असभ्य वर्तनामुळे मला तुझी माफी मागायची आहे. मी अनेक गोष्टींवर तुझ्याशी असहमत असू शकतो. परंतु माझी निराशा किंवा राग आधीची आहे. तुझे ट्विट वाचून मी माझ्या शब्दांना न्याय देऊ शकत नाही."
Dear @NSaina pic.twitter.com/plkqxVKVxY
— Siddharth (@Actor_Siddharth) January 11, 2022
पुढे सिद्धार्थ म्हणतो की, "एखाद्या विनोदाला समजावून सांगायचे असल्यास, तो विनोदही राहत नाही. त्यामुळे मी माझ्या विनोदाबद्दल माफी मागतो. मी माझ्या शब्द निवडीवर आणि विनोदावर जोर दिला पाहिजे. कोणताही चुकीचा हेतू नव्हता. "मी स्वतः एक कट्टर स्त्रीवादी समर्थक आहे आणि मी मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की माझ्या ट्विटमध्ये कोणतेही लिंग नव्हते आणि एक महिला म्हणून तुमच्यावर शाब्दीक हल्ला करण्याचा नक्कीच कोणताही हेतू नव्हता."
त्याने पुढे लिहिले, "आशा आहे की तुम्ही या सर्व गोष्टी विसराल आणि माझी माफी स्वीकाराल. तुम्ही नेहमीच माझे चॅम्पियन राहाल."