रणबीरच्या बर्थडे पार्टीतही जाणवला सिद्धार्थ-आलियामधील दुरावा !

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्याने घरी एका पार्टीचे आयोजन केले होते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 28, 2017, 03:52 PM IST
रणबीरच्या बर्थडे पार्टीतही जाणवला सिद्धार्थ-आलियामधील दुरावा ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्याने घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. त्याच्या या पार्टीला शाहरुख खान, करण जोहर, आमिर खान, किरण राव यांसारखी मंडळी उपस्थित होती. या पार्टीत आलिया भटट् आणि सिद्धर्थ मल्होत्रा हे दोघ पण आले होते. 

‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या जोडीची सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना भुरळ पडली होती. आणि त्यानंतर हे दोघ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत जवळीक वाढल्याने आलीय आणि सिद्धार्थच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आणि त्यानंतर अनेक कार्यक्रमांना ही जोडी एकत्र दिसत नव्हती. 

हॉलिडेज आणि पार्ट्या एकत्र सेलिब्रेट करणाऱ्या या जोडीचा दुरावा रणबीरच्या पार्टीत स्पष्टपणे दिसत होता. ‘स्पॉटबॉय इ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आलिया आणि सिद्धार्थ पार्टीमध्ये वेगवेगळे आले, पार्टीतही ते वेगवेगळ्या मित्रमंडळींसोबत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पाहुणे आल्यानंतर आलिया विकी कौशल, इम्तियाज अली, करण जोहर, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर यांच्यासोबत बसली. त्यानंतर काही वेळाने सिद्धार्थही त्यांच्यात येऊन बसला. पण, तेव्हा मात्र त्यांच्यातला संकोचलेपणा लगेच दिसून आला. त्यांनी एकमेकांसोबत बोलणंही टाळलं. 

पण, पार्टीतून निघताना या दोघांनी एकमेकांचा निरोप घेतल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांच्या नात्यात आलेला हा दुरावा कधी मिटणार याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x