मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी कधीच खुल्लमखुल्ला आपल्या प्रेमाची कबुली दिली नसली तरी हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं त्यांना फार काळ लपवून ठेवता आलं नाही... पण, आता मात्र हे दोघे एकत्र नाहीत.
होय... सूत्रांच्या माहितीनुसार, या दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतलाय. आलिया आणि सिद्धार्थ दोघांही एकमेकांना टाळताना दिसतायत. त्यांच्यातलं संभाषणही आता संपुष्टात आलंय. दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी जोरदार भांडण झाल्याचंही समजतंय.
नात्यात काहीच अर्थ उरला नसेल तर दोघांनीही वेगवेगळे मार्ग निवडावेत, असं त्यांना वाटतंय... आलिया - सिद्धार्थच्या ब्रेकअपमध्ये जॅकलीन फर्नांडीसचं नावही चर्चेत आहे.
सिद्धार्थ आणि जॅकलीन 'अ जेंटलमन' या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. सेटवरील शूटदरम्यान या दोघांची मैत्री चांगलीच बहरलेली दिसतेय. त्याचाही परिणाम आलिया - सिद्धार्थच्या नात्यावर झाला असल्याचं सांगण्यात येतंय.
आलिया आणि सिद्धार्थनं करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इअर'मध्ये एकत्रच बॉलिवूड पदार्पण केलं होतं.