Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding: लग्नाआधीच कियारा अडवाणीचा लेहेंग्यातील फोटो व्हायरल

Kiara Advani & Sidharth Malhotra Wedding updates: 'शेरशाह' चित्रपटातील आपल्या केमिस्ट्रीने देशभरातील चाहत्यांना खूश करणारे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी आज अखेर लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र त्यांच्या लग्नापूर्वी सोशल मीडियावर कियारा अडवानीचे फोटो शेअर होत आहे. 

Updated: Feb 7, 2023, 10:08 AM IST
Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding: लग्नाआधीच कियारा अडवाणीचा लेहेंग्यातील फोटो व्हायरल

Kiara Advani & Sidharth Malhotra Wedding updates: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding) गेल्या काही वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलीवूडचं हे क्यूट कपल अखेर आज, 7 फेब्रुवारी 2023 लग्नबंधनात अडकणार आहेत. 'शेरशाह' सिनेमाचं हे कपल जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये (Suryagarh Palace in Jaisalmer) हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. मात्र या दोघांचे लग्नाचे कोणतेही फोटो समोर आले नसले तरी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कियारा अडवाणी गुलाबी लेहंगामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. मात्र व्हायरल फोटो (photo viral) हा सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या प्री वेडिंगमधला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

वाचा: सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्न सोहळ्यासाठी संपूर्ण हॉटेल सजलेले, पाहा VIDEO  

तसेच सिद्धार्थ आणि कियारा यांचा शाही विवाह सोहळा जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये होणार असून याठिकाणी शस्त्रांसह सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत. स्पेशल सिक्युरिटीही तैनात करण्यात आली आहे. याचं कारण आहे ते म्हणजे कियाराची बालपणीची मैत्रीण आणि मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित असणार आहे. मात्र यांच्या लग्नापूर्वी कियारा अडवाणीचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहे. कियाराचा जो फोटो समोर आला आहे त्यामध्ये तिच्या प्री-वेडिंगमधील असल्याचे सांगितले जाते. 

या फोटोमध्ये कियारा तिच्या मित्रांसोबत दिसत असल्याचे तुम्ही पाहू शकता. तसेच तिने गुलाबी रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे. सोबत असणार्‍या नववधूंनी कानात मोठमोठे झुमके घातले आहेत. कियाराचा हा फोटो  प्री वेडिंगमधला असल्याचे म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात हा दुसऱ्याच्या लग्नातील फोटो आहे.