'सिंबा'चा १३ दिवसात २०० करोड रुपयांचा आकडा पार

रणवीर सिंग आणि सारा अली खानचा 'सिंबा' हा सिनेमा प्रदर्शित होऊन १३ दिवस झाले आहेत. सिनेमाने १३  दिवसांत २०० करोड रुपयांचा गल्ला जमा केला आहे. 

Updated: Jan 10, 2019, 03:36 PM IST
'सिंबा'चा १३ दिवसात २०० करोड रुपयांचा आकडा पार  title=

मुंबई : रणवीर सिंग आणि सारा अली खानचा 'सिंबा' हा सिनेमा प्रदर्शित होऊन १३ दिवस झाले. सिनेमाने १३ दिवसांत २०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 'सिंबा' नव्या वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा सिनेमा ठरला आहे. सिंबा २०१८चा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. शाहरूख खानचा 'झिरो' आणि रणवीर सिंहचा 'सिंबा' या दोन्ही सिनेमांच्या टफफाइटमध्ये रणवीर सिंह आणि सारा अली खानच्या 'सिंबा'ने बाजी मारली आहे. सिंबा 28 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला, यानंतर सिम्बाने चार दिवसात चाहत्यांची मन जिंकली. 'सिंबा' सक्सेस पार्टीमध्ये रणवीर पत्नी दीपिकासोबत पोहचला होता. अजयची झलक असलेल्या 'सिंबा' सक्सेस पार्टीमध्ये काजोल आणि अजय देवगन पोहचला होता.

Image result for simmba zee

 

प्रदर्शित होऊन १३ दिवस   

 'सिंबा'ला प्रदर्शित होऊन १३ दिवस झाले आहेत. पण बॉक्स ऑफिसवर रोहित शेट्टीच्या 'सिंबा' सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. रोहित शेट्टीच्या 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'गोलमाल अगेन'सोबत 'सिंबा' हा 200 करोड रुपयांचा गल्ला जमा जमा करणारा सिनेमा ठरला आहे.

२०१८ मध्ये 'सिंबा' हा सिनेमा सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा सिनेमा ठरला आहे. याआधी 'संजू'ने बॉक्स ऑफिसवर 341 करोड रूपयंचा गल्ला जमा केला असून पद्मावतने 300 करोड रुपयांचा गल्ला जमा करून घसघशीत कमाइ केली होती. करण जोहरच्या प्रोडक्शनमध्ये बनलेली 'सिंबा'ही फिल्म चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करत आहे.

'सिंबा' सिनेमाची क्रेझ अजूनही कमी झालेली नसताना. 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' आणि 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या सिनेमांची बॉक्सऑफिसवर टक्कर बघणे मजेशीर ठरणार आहे.